agriculture news in marathi Turmeric turnover in Sangli fell by Rs 280 crore | Page 2 ||| Agrowon

सांगलीत हळदीची उलाढाल २८० कोटींनी घटली

टीम अॅग्रोवन
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

सांगली ः कोरोना विषाणूमुळे बाजार समित्या बंद होत्या. याचा फटका हळद व्यापारावर झाला आहे. सांगलीतील बाजार समितीत स्थानिक हळदीची आवक २ लाख क्विंटलने कमी झाली. 

सांगली ः कोरोना विषाणूमुळे बाजार समित्या बंद होत्या. याचा फटका हळद व्यापारावर झाला आहे. सांगलीतील बाजार समितीत स्थानिक हळदीची आवक २ लाख क्विंटलने कमी झाली असून परराज्यातील हळदीची आवकच झाली नाही. त्यामुळे बाजार समितीची २८० कोटींनी उलाढाल कमी झाली आहे.

सांगलीची बाजारपेठ हळदीसाठी देशात प्रसिद्ध आहे. त्यामुळे इथल्या बाजारपेठेत स्थानिक, हळदीबरोबर आंध्र प्रदेश, कर्नाटकसह अन्य राज्यांतून हळद विक्रीसाठी शेतकरी येतात. हळदीची वर्षाकाठी सहाशे कोटी रुपयांची उलाढाल होते. २० जानेवारीला नव्या हळदीच्या सौद्यांना प्रारंभ झाला. हळदीची आवक कमी अधिक होती.

मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून हळदीच्या आवकीत वाढ झाली होती. परिणामी दरात चढ-उतार असल्याने शेतकऱ्यांनी हळद विक्री करण्याचे काही प्रमाणात थांबवले होते.दरम्यान, २२ मार्चपासून लॉकडाऊनला सुरवात झाली. त्याचा फटका बाजार समितीला बसला.

बाजार समितीतील सौदे बंद करण्यात आले होते. त्यामुळे हळदीचे सौदे जवळपास ५० ते ५५ दिवस काढलेच नाही. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात नव्या हळदीची आवक मोठ्या प्रमाणात होते. यंदा याच कालावधीत उलाढाल थांबली.

सांगलीच्या बाजार समितीत आंध्र प्रदेश, निजामाबाद, कडप्पा, डुगीराला, तेलंगणा, तमिळनाडू, कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात हळदीची आवक होते. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे परराज्यातील वाहतूक व्यवस्था बंद होती. यामुळे परराज्यातील हळदीची आवक झाली नाही. जिल्हा प्रशासन आणि बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांच्या पुढाकाराने ई-नामद्वारे सौदे करण्याचा निर्णय घेतला. २९ एप्रिल पासून हळदीचे सौदे सुरु झाले.

या ऑनलाइन सौद्यांना व्यापारी अडते आणि शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु परराज्यातील हळद सौद्यासाठी आली नाही. त्यामुळे ऐन हळदीच्या हंगामात स्थानिक आणि परराज्यातील हळदीची आवक मोठ्या प्रमाणात घटली. 

कोरोना विषाणूचा परिणाम स्थानिक आणि परराज्यातील हळदीच्या आवकेवर झाला. यामुळे हळदीची उलाढाल कमी झाली आहे. पुढील हंगामात बाजार समिती आणि अडते संयुक्त पद्धतीने बाजार समितीत हळदीची आवक कशी वाढेल, याचा निश्चित प्रयत्न केला जाणार आहे. 
- दिनकर पाटील, सभापती, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती.

 


इतर अॅग्रोमनी
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या दरात...कोल्हापूर : जागतिक बाजारपेठेत साखरेच्या दरात वाढ...
शेतजमीन भाडेपट्ट्यावर देण्यासाठी...नवी दिल्ली ः शेतजमिनी भाडेपट्ट्यावर देण्यासाठी...
‘व्हेजनेट’वर होणार ४३ पिकांची नोंदणी नागपूर ः निर्यातीसह देशांतर्गत ग्राहकांना...
शेती, संलग्न क्षेत्रांच्या निधीत कपात पुणे ः केंद्रीय अर्थसंकल्पात यंदा शेती आणि संलग्न...
बियाणे उद्योगाला जीएसटी परताव्याची...पुणे : अंतिम उत्पादनावर जीएसटी नसला तरी...
साखर विक्रीचा दबाव कायम कोल्हापूर : साखर विक्रीच्या दबावाखाली आलेल्या...
कृषी पतपुरवठ्याचे उद्दिष्ट यंदा वाढणारनवी दिल्ली : शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत...
साखरेच्या निर्यात योजनेत लवचिकताकोल्हापूर : यंदा साखर जास्तीत जास्त निर्यात...
छत्तीसगडमध्ये आजवरची सर्वाधिक धान खरेदीरायपूर : : छत्तीसगडमध्ये आजवरची सर्वाधिक धान...
अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये सोयाबीन... पुणे ः प्रतिकूल हवामानामुळे  ...
देशातील साखर उत्पादन ‘सुसाट’; १४२ लाख...कोल्हापूर : यंदाच्या हंगामातील साखर उत्पादनाने...
आधारभावाअभावी मक्याची परवडचालू हंगामासाठी केंद्र सरकारने मक्याला १८५० रुपये...
अमेरिकेत सोयाबीन उत्पादनात घटवॉशिंग्टन ः अमेरिकेत यंदा सोयाबीन उत्पादनात घटीचा...
जागतिक मका उत्पादनात घट वॉशिंग्टन ः जागतिक मका उत्पादनात घट होणार...
बेदाणा पॅकिंगसाठीच्या बॉक्सच्या दरात...सांगली ः बेदाणा, डाळिंबासह अन्य फळभाज्यांच्या...
सोयाबीन विक्रमी टप्पा गाठेल कमी उत्पादन, चांगली निर्यात आणि वाढलेला वापर हे...
दराचे संरक्षण देणाऱ्या योजना राबवाव्यात पुणे ः ‘एनसीडीईएक्स’ने ‘पुट ऑप्शन’मधून शेतकरी...
‘बासमती’ची तांदळाचा तुटवडाकोल्हापूर: गेल्या महिन्यापासून सुरु असलेल्या...
सोयाबीन बाजारात तेजीचेच संकेतपुणे ः शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी ८० टक्के सोयाबीन...
तांदळाच्या विक्रमी निर्यातीची यंदा शक्‍...कोल्हापूर : देशात यंदा भाताचे चांगले उत्पादन...