agriculture news in marathi Turmeric turnover in Sangli fell by Rs 280 crore | Agrowon

सांगलीत हळदीची उलाढाल २८० कोटींनी घटली

टीम अॅग्रोवन
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

सांगली ः कोरोना विषाणूमुळे बाजार समित्या बंद होत्या. याचा फटका हळद व्यापारावर झाला आहे. सांगलीतील बाजार समितीत स्थानिक हळदीची आवक २ लाख क्विंटलने कमी झाली. 

सांगली ः कोरोना विषाणूमुळे बाजार समित्या बंद होत्या. याचा फटका हळद व्यापारावर झाला आहे. सांगलीतील बाजार समितीत स्थानिक हळदीची आवक २ लाख क्विंटलने कमी झाली असून परराज्यातील हळदीची आवकच झाली नाही. त्यामुळे बाजार समितीची २८० कोटींनी उलाढाल कमी झाली आहे.

सांगलीची बाजारपेठ हळदीसाठी देशात प्रसिद्ध आहे. त्यामुळे इथल्या बाजारपेठेत स्थानिक, हळदीबरोबर आंध्र प्रदेश, कर्नाटकसह अन्य राज्यांतून हळद विक्रीसाठी शेतकरी येतात. हळदीची वर्षाकाठी सहाशे कोटी रुपयांची उलाढाल होते. २० जानेवारीला नव्या हळदीच्या सौद्यांना प्रारंभ झाला. हळदीची आवक कमी अधिक होती.

मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून हळदीच्या आवकीत वाढ झाली होती. परिणामी दरात चढ-उतार असल्याने शेतकऱ्यांनी हळद विक्री करण्याचे काही प्रमाणात थांबवले होते.दरम्यान, २२ मार्चपासून लॉकडाऊनला सुरवात झाली. त्याचा फटका बाजार समितीला बसला.

बाजार समितीतील सौदे बंद करण्यात आले होते. त्यामुळे हळदीचे सौदे जवळपास ५० ते ५५ दिवस काढलेच नाही. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात नव्या हळदीची आवक मोठ्या प्रमाणात होते. यंदा याच कालावधीत उलाढाल थांबली.

सांगलीच्या बाजार समितीत आंध्र प्रदेश, निजामाबाद, कडप्पा, डुगीराला, तेलंगणा, तमिळनाडू, कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात हळदीची आवक होते. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे परराज्यातील वाहतूक व्यवस्था बंद होती. यामुळे परराज्यातील हळदीची आवक झाली नाही. जिल्हा प्रशासन आणि बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांच्या पुढाकाराने ई-नामद्वारे सौदे करण्याचा निर्णय घेतला. २९ एप्रिल पासून हळदीचे सौदे सुरु झाले.

या ऑनलाइन सौद्यांना व्यापारी अडते आणि शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु परराज्यातील हळद सौद्यासाठी आली नाही. त्यामुळे ऐन हळदीच्या हंगामात स्थानिक आणि परराज्यातील हळदीची आवक मोठ्या प्रमाणात घटली. 

कोरोना विषाणूचा परिणाम स्थानिक आणि परराज्यातील हळदीच्या आवकेवर झाला. यामुळे हळदीची उलाढाल कमी झाली आहे. पुढील हंगामात बाजार समिती आणि अडते संयुक्त पद्धतीने बाजार समितीत हळदीची आवक कशी वाढेल, याचा निश्चित प्रयत्न केला जाणार आहे. 
- दिनकर पाटील, सभापती, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती.

 


इतर अॅग्रोमनी
अमेरिकेत सोयाबीन उत्पादनात घटवॉशिंग्टन ः अमेरिकेत यंदा सोयाबीन उत्पादनात घटीचा...
जागतिक मका उत्पादनात घट वॉशिंग्टन ः जागतिक मका उत्पादनात घट होणार...
बेदाणा पॅकिंगसाठीच्या बॉक्सच्या दरात...सांगली ः बेदाणा, डाळिंबासह अन्य फळभाज्यांच्या...
सोयाबीन विक्रमी टप्पा गाठेल कमी उत्पादन, चांगली निर्यात आणि वाढलेला वापर हे...
दराचे संरक्षण देणाऱ्या योजना राबवाव्यात पुणे ः ‘एनसीडीईएक्स’ने ‘पुट ऑप्शन’मधून शेतकरी...
‘बासमती’ची तांदळाचा तुटवडाकोल्हापूर: गेल्या महिन्यापासून सुरु असलेल्या...
सोयाबीन बाजारात तेजीचेच संकेतपुणे ः शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी ८० टक्के सोयाबीन...
तांदळाच्या विक्रमी निर्यातीची यंदा शक्‍...कोल्हापूर : देशात यंदा भाताचे चांगले उत्पादन...
कापसाच्या दरात सुधाराची चिन्हेपुणे ः ‘सीसीआयने’ कापसाला हमीभावापेक्षा  ३००...
केंद्रीय अर्थसंकल्पातून होणार सवलतींची...नवी दिल्ली ः कोरोनाच्या संसर्गामुळे...
मालविक्रीसाठी ३५ शेतकरी कंपन्या एकाच...शेतकऱ्यांना ‘शेतीमाल पिकवता येतो, मात्र विकता येत...
हंगामाच्या प्रारंभीच कोलम, आंबेमोहोर...कोल्हापूर: देशातील तांदळाचा हंगाम सुरु झाला आहे....
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ...कोल्हापूर : राज्य सहकारी साखर कारखाना...
सुताच्या दरात मोठी वाढजळगाव ः जगभरातील प्रमुख आयातदारांकडून सुताची मोठी...
कारखान्यांपुढे साखर विक्रीचे आव्हानकोल्हापूर : गेल्या काही दिवसांत देशात वाढणारी...
हमीभावाने १८ टक्के अधिक धान्य खरेदी :...नवी दिल्ली : केंद्र सरकारने नोव्हेंबरअखेर खरीप...
कापूस गाठींच्या दरात सुधारणाजळगाव ः जगातील वस्त्रोद्योग ९५ ते ९७ टक्के...
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला दराचा...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या पंधरा...
खाद्यतेल आयातीत १२ टक्के घटपुणे ः देशात २०१९-२० (नोव्हेंबर ते ऑक्टोबर) मध्ये...
चांगल्या बाजारभावासाठी ‘एनसीडीईएक्स’चा...शेतकऱ्यांसाठी दराचे संरक्षण (प्राइज इन्शुरन्स)...