किसान रेल्वेने सांगलीतून हळद जाणार इतर राज्यात

किसान रेल्वेतून शेतकऱ्यांसह, उद्योग आणि व्यावसायिकांचा माल वाहतूक व्यवस्था सुरू केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सांगलीतून सर्वाधिक पिकणारी हळदही निर्यात होणार आहे. यासाठी शेतकरी आणि रेल्वे अधिकारी यांच्यात चर्चा सुरू आहे, अशी माहिती हळद व्यापारी यांनी दिली.
Turmeric will go from Sangli to other states by Kisan Railway
Turmeric will go from Sangli to other states by Kisan Railway

सांगली ः किसान रेल्वेतून शेतकऱ्यांसह, उद्योग आणि व्यावसायिकांचा माल वाहतूक व्यवस्था सुरू केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सांगलीतून सर्वाधिक पिकणारी हळदही निर्यात होणार आहे. यासाठी शेतकरी आणि रेल्वे अधिकारी यांच्यात चर्चा सुरू आहे, अशी माहिती हळद व्यापारी यांनी दिली.

रेल्वे बोर्डाकडून मालवाहतुकीसाठी शेतकऱ्यांसह, उद्योग आणि व्यावसायिकांचा माल ५० टक्के सवलतीमध्ये मालवाहू करण्याची मुभा देण्यात आली आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन असणार आहे. तर यासाठी ऑनलाइन नोंदणी गरजेची आहे. खासगी वाहतुकीपेक्षा अत्यंत अल्प खर्चामध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल आणि उद्योगासह अन्य वस्तूंची पाठवण दिल्ली दरबारी होणार आहे.

दर रविवार सकाळी दहा वाजता ही किसान रेल्वे मिरजेतून कुर्डूवाडी मार्गे धावत आहे. आधी पूर्ण भाडे आकारून सेवा देणारी ही गाडी आता यापुढे मात्र ५० टक्के सबसीडीच्या तत्त्वावर सुटेल. यामुळे सांगली, मिरजसह सोलापूर येथील पंढरपूर, सांगोला, कुर्डुवाडी येथील शेतकरी आणि उद्योग व्यवसायिकांना याचा फायदा होणार आहे. संपूर्ण सुरक्षा आणि अल्प दरात माल वाहतूक होत असल्याने सर्व व्यवसायिकांना आपला माल राज्याबाहेर ही पाठवता येणार आहे. दर रविवारी मिरज येथून दुपारी एक वाजून दहा मिनीटांनी रवाना होणार आहे. यासाठी रेल्वेच्या पार्सल विभागाकडे साहित्यांची नोंदणी करणे गरजेचे आहे.

हळद वाहतुकीसाठी व्यापाऱ्यांशी चर्चा सांगली जिल्ह्यात द्राक्ष शेतीनंतर हळद शेती मोठ्या प्रमाणात होत असते. यामुळे सांगलीची हळद दिल्ली दरबारी रेल्वेने कमी खर्चात जाणार आहे. यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांकडून व्यापारी वर्गाशी चर्चा सुरू आहे. सध्या मिरज स्थानकातून शिमला मिरर्ची, कांदा, बटाटा यासह फळ भाज्यांची वाहतुकीस मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

रेल्वेच्या संकेतस्थळावर नोंदणी खासगी वाहतुकीपेक्षा ५० टक्के सवलत घेऊन अल्पदरात माल पाठविण्यासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. यासाठी रेल्वेच्या अधिकृत संकेत स्थळावर नोंदणी करणे आवश्‍यक आहे. या प्रक्रियेनंतर शेतमाल हा ५० टक्के सवलतीमध्ये पाठवला जाणार आहे.

या राज्यातून जाणार किसान रेल्वे कर्नाटकातील म्हैसूर जंक्‍शन, हसन जंक्‍शन, अरसिकेरी जंक्‍शन, हुबळी, बेळगाव, लोंढा तर महाराष्ट्रातील मिरज जंक्‍शन, सांगोला, कुर्डुवाडी, दौंड, मनमाड, भुसावळ मध्यप्रदेशातील इटारसी, भुपाल, झासी, आग्रा, मथुरा दिल्लीतील हजरत निजामुद्दीन या स्थानकातून जाते.

जिल्ह्यातून हळद आणि बेदाणा माल किसान रेल्वेतून इतर राज्यात पाठवणे सोपे झाले आहे. यामुळे व्यापार वाढण्यास मदत होईल. याबाबत रेल्वे अधिकारी आणि व्यापारी यांच्यात याबाबत चर्चा झाली आहे. मुळात यामुळे वाहतुकीचा खर्च कमी होईल. रेल्वे विभागाने वाहतूक व्यवस्था पारदर्शक ठेवणे गरजेचे आहे. - गोपाळ मर्दा, हळद व्यापारी सांगली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com