कृषी प्रक्रिया उद्योगाकडे वळावे ः डॉ. शर्मा

मिनी डाळ मिल उद्योग उभारणी तरुणांसाठी सुवर्ण संधी असल्याचे विचार दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र डिघोळअंबाचे प्रमुख डॉ. सौरभ शर्मा यांनी व्यक्त केले.
Turn to agro-processing industry: Dr. Sharma
Turn to agro-processing industry: Dr. Sharma

अंबाजोगाई, जि. बीड : नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगार निर्माण करावा. सध्या कृषिपूरक प्रक्रिया उद्योगांना भरपूर संधी असून, गावपातळीवर असे उद्योग उभारण्याची गरज आहे. जिल्ह्यात असलेल्या हरभरा व तूर पिकांच्या लागवड नोंदीच्या आधारावर पाहिले असता, मिनी डाळ मिल उद्योग उभारणी तरुणांसाठी सुवर्ण संधी असल्याचे विचार दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र डिघोळअंबाचे प्रमुख डॉ. सौरभ शर्मा यांनी व्यक्त केले.

दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र डिघोळअंबा ता. अंबाजोगाई येथे ‘मिनी डाळ मिल : संचलन, काळजी व निगा’ या विषयावरील ७ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी डॉ. सौरभ शर्मा बोलत होते.

या प्रशिक्षणात कृषी अभियंता प्रमोद रेणापूरकर यांनी आजची दरडोई डाळ उपलब्धता कमी असून, वाढती लोकसंख्या बरोबरच डाळ तयार करण्याच्या पारंपरिक पद्धती व योग्य यंत्राचा अभाव असल्याचे सांगून मिनी डाळ मिल, डबल रोल मिनी डाळ मिल यंत्र, कच्चा माल खरेदीसाठीची ओळख, विविध डाळी तयार करण्याची प्रक्रिया, यंत्र चालविताना घ्यावयाची काळजी निगा तसेच प्रकल्प अहवाल व अनुदान या बाबत प्रशिक्षणार्थींना माहिती देण्यात आली.

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला निर्मित मिनी डाळ मिल ही वापरण्यास अत्यंत सुलभ असून, कमीत कमी भांडवल, जागा, वीज व मनुष्यबळामध्ये महिला किंवा पुरुष यांच्या वैयक्तिक अथवा गटांद्वारे उभारण्यास वाव असल्याचे श्री. प्रमोद रेणापूरकर यांनी या वेळी सांगितले. या कार्यक्रमात दोन विविध मिनी डाळ मिल यंत्रावर प्रशिक्षणार्थींना डाळनिर्मितीचा अनुभव देण्यात आला. तसेच परिसरातील यशस्वी तरुणांच्या मिनी डाळ मिल उद्योगांना भेटी देऊन त्यांना प्रेरणा देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com