agriculture news in marathi Turn to linseed: Dr. Zaade | Agrowon

जवस पिकाकडे वळा : डॉ. झाडे

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 5 मार्च 2021

औरंगाबाद : एकरी लागवड खर्च ५ ते ६ हजार करून २५-३० हजार उत्पन्न जवसाच्या पिकातून मिळवता येते. एलएसएल-९३ हा वसंतराव नाईक मराठवाडा कृषीविद्यापीठ, परभणी यांनी विकसित केलेला अत्यंत चांगला वाण आहे.

औरंगाबाद : ‘‘एकरी लागवड खर्च ५ ते ६ हजार करून २५-३० हजार उत्पन्न जवसाच्या पिकातून मिळवता येते. एलएसएल-९३ हा वसंतराव नाईक मराठवाडा कृषीविद्यापीठ, परभणी यांनी विकसित केलेला अत्यंत चांगला वाण आहे. तो कमी दिवसांत (८३ दिवसांत) परिपक्व होतो. कमी पाण्यावर येऊन अधिक उत्पन्न येते. त्यामुळे या पिकाकडे अधिकाधिक शेतकऱ्यांनी वळावे’’, असा सल्ला कृषी विज्ञान केंद्राचे 
कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे यांनी दिला.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीअंतर्गत कृषीविज्ञान केंद्र, औरंगाबादतर्फे बुधवारी (ता. ३) करजगाव (जि. औरंगाबाद) येथे जवस शेती दिन कार्यक्रम झाला. विषय विशेषज्ञ डॉ. बस्वराज पिसुरे, अशोक निर्वळ, करमाडचे मंडळ कृषी अधिकारी, लक्ष्मण काळे, कृषी विज्ञान केंद्राचे कर्मचारी इरफान शेख, शिवा काजळे, किशोर शेरे आदी उपस्थित होते.
डॉ. झाडे म्हणाले, ‘‘जवसात ओमेगा ३ हा घटक आहे. तो आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे दररोजच्या आहारात शेतकऱ्यांनी जवसाचा उपयोग करावा.’’

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे म्हणाले, ‘‘जवस हे जुनेच पीक आहे. परंतु त्याची लागवड आता कमी होत आहे. जवस हे आरोग्यासाठी फार उपयुक्त आहे. कमी पाण्यामध्ये व कमी खर्चामध्ये अधिक नफा मिळून देणारे हे पीक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकाकडे नक्की वळावे. या बरोबर जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी सोयाबीन पिकाकडे वळावे. जवस, सोयाबीन पिकांचे बियाणे सर्व शेतकऱ्यांनी शिल्लक ठेवावे. इतर शेतकऱ्यांपर्यंत या बियाण्यांचा प्रसार करावा.’’ 

निर्वळ म्हणाले, ‘‘बदलत्या हवामानाचा शेतीवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे या बदलत्या हवामानाशी निगडित राहून शेतकऱ्यांनी शेती करणे गरजेचे आहे. पिकांचे आपत्कालीन व सध्यस्थितीतील नियोजनाच्या माहितीसाठी जिल्हा कृषी हवामान केंद्र (DAMU) द्वारे कृषी हवामान सल्ला पत्रिका तयार करून प्रसारित करण्यात येतात. 

यात पुढील पाच दिवसांच्या हवामानाच्या अंदाजानुसार पीकनिहाय सल्ला शेतकऱ्यांना देण्यात येतो.’’ कृषी विद्यापीठाची कृषी दिनदर्शिका तसेच शेती निविष्ठांचे वाटप या वेळी करण्यात आले. 

शेतकऱ्यांनी जवस पिकाकडे वळून या पिकाचे उत्पादन वाढवावे. हे पीक कमी पाण्यात येणारे आहे. त्यामुळे हे पीक शेतकऱ्यांना फायदेशीर आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
नगर : पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग...नगर : नैसर्गिक संकटाने तसेच अन्य कारणाने...
`दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर...सोलापूर ः करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन...
पुणे बाजार समिती चक्राकार पद्धतीने सुरू...पुणे : कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या झपाट्याने...
देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरीसोलापूर ः देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरी...
पाण्याच्या उपलब्धतेमुळे उन्हाळी...पुणे : गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे...
हिंगोली ः सोयाबीनची अडीच लाख हेक्टरवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८...
अमरावतीत खरिपाचे ७ लाख हेक्टर क्षेत्र...अमरावती : कृषी विभागाच्या खरीप हंगाम २०२१...
नाशिक बाजार समितीच्या ‘त्या’ याचिका...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती...
बियाणे, खते, कीटकनाशक नियंत्रणासाठी...नाशिक : खरीप हंगामात बियाणे पेरणीचा कालावधी...
औरंगाबाद जिल्हाभरात फळे, भाजीपाला थेट...औरंगाबाद : शहरासह जिल्हाभरात राबविल्या जात...
लातूर जिल्ह्यात त्रेचाळीस हजार क्विंटल...लातूर: जिल्ह्यात कार्यान्वित १६ केंद्रांवरून २७५९...
अवैध दारू विक्रेत्यांना शासकीय योजनांचा...चंद्रपूर : अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य...
ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचा अधिकार...मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची...
फळाचे ‘प्रमोशन’, मूल्यवर्धन होण्याची...चिकू बागायतदार संघाच्या वतीने राज्यातील चिकू...
अकोला जिल्हा परिषदेत खांदेपालटाची चर्चा अकोला : जिल्हा परिषदेत सत्तारूढ असलेल्या वंचित...
प्रक्रिया उद्योगाला चालना देणारनारळ लागवडीचे क्षेत्र वाढविताना शेतकऱ्यांच्या...
सामूहिक प्रयत्नातून काजू उत्पादकांची...जागतिक बाजारपेठेत वैशिष्ट्यपूर्ण चव असलेल्या...
क्षेत्र वाढ, प्रक्रियेसाठी सरकारी...देशात पेरू लागवडीचे सुमारे तीन लाख हेक्टर आणि...
दुर्लक्षित पिकांनाही येत्या काळात संधीद्राक्ष, डाळिंब, आंबा, केळी, संत्रा ही राज्याच्या...
आधुनिक फुलशेती संशोधन, निर्यात...गेल्या काही वर्षांत व्यावसायिक आणि उद्योगाचा...