राष्ट्रीयीकृत बँकांचा कर्ज निधी वळता करा ः नाना पटोले

भंडारा : राष्ट्रीयीकृत बँकेतील निधी जिल्हा सहकारी बँकेत वळता करुन शेतकऱ्यांना वेळेत कर्ज देण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
Turn the loan fund of nationalized banks: Nana Patole
Turn the loan fund of nationalized banks: Nana Patole

भंडारा : कर्ज वाटपात सहकार क्षेत्राच्या तुलनेत राष्ट्रीयीकृत बँकांचे उद्दिष्ट फारच कमी आहे. शेतकऱ्यांना याचवेळी पैशाची गरज असते ते मिळणार नाही तर शेतकऱ्यांचा हंगाम कसा होईल. शासनाने राष्ट्रीयीकृत बँकेतील कर्ज वाटपाचा निधी सहकारी बँकेकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुषंगाने राष्ट्रीयीकृत बँकेतील निधी जिल्हा सहकारी बँकेत वळता करुन शेतकऱ्यांना वेळेत कर्ज देण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली धान खरेदी, खरीप हंगाम, पीकविमा व पीक कर्ज वितरण संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन, अप्पर जिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोदवड, जिल्हा पूरवठा अधिकारी अनिल बन्सोड, गोसीखुर्द प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता तसेच सिचंन विभागाचे अभियंता, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, पणन अधिकारी खाडे संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

सिंचन विभागाने प्रकल्पात जास्तीत जास्त पाण्याचा साठा कसा होईल यावर युद्धस्तरावर काम करण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्षांनी केल्या. अपूर्ण कालव्याच्या कामास गती देऊन भूसंपादनाच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर करुन प्रकल्पग्रस्तांना मोबदला द्या, आपसी समझोता करुन जमिनीचे अधिग्रहण करा, असे त्यांनी सांगितले. 

यावेळी बावनथडी, पेंच, कन्हान, करजखेडा, नेरला, सूरेवाडा, तसेच प्रस्तावित गणेशपूर, धारगाव, कोची पेंच वळण कालवा, कृषी विभाग, विद्युत विभागाचा आढावा त्यांनी घेतला. 

भटक्या समाजाला मोफत धान्य द्या  अन्न पुरवठा अंतर्गत धान्य वाटपासंदर्भात बोलतांना जिल्ह्यातील भटक्या समाजातील लोकांना रेशनकार्ड अभावी धान्य मिळत नसल्याने त्यांना रेशन कार्ड देऊन मोफत धान्य कसे देता येईल याबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी यांना दिल्या. उपेक्षितांना मोफत धान्य कसे देता येईल यावर धोरण ठरवा. त्याचा पाठपुरावा शासनस्तरावर करता येईल, असे त्यांनी सांगितले. 

धान खरेदीतील बोगसगिरीवर गुन्हे नोंदवा  धान खरेदीचा आढावा घेतांना ते म्हणाले की, शेतकऱ्यांना धानाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. योजना शेतकऱ्यांसाठी आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांनाच झाला पाहिजे व्यापाऱ्यांना नाही. कापूस, तूरीचा मोबदला लकरात लवकर द्या. बोगस सातबारावर धान खरेदी करणाऱ्यावर तात्काळ एफआयआर नोंदवून गुन्हे दाखल करा, खरेदीवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. हंगामाच्या काळात कोणत्याही शेतकऱ्यास खतांचा तुटवडा जाणवणार नाही याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी, शेतकऱ्यांना विनाखंड ८ तास पुरेशा विद्युत पुरवठा करा, असे त्यांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com