Agriculture news in Marathi, At the turning point of 'Wan' water | Agrowon

‘वान’चा पाणी प्रश्न पेटण्याच्या वळणावर
टीम अॅग्रोवन
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

अकोला ः जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वान प्रकल्पातील पाणी अकोला महानगराला अमृत योजनेअंतर्गत राखीव ठेवण्यास शासनाने मंजुरी दिल्यानंतर याविरुद्ध ग्रामीण भागात तीव्र संताप वाढू लागला आहे. ठिकठिकाणी विरोध होत असून, दोन दिवसांपूर्वी तेल्हारा तालुक्यात एका कार्यक्रमासाठी आलेल्या स्थानिक आमदारांवर शेतकऱ्यांनी प्रश्‍नांचा भडिमार केल्याची घटना समोर आली.

अकोला ः जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वान प्रकल्पातील पाणी अकोला महानगराला अमृत योजनेअंतर्गत राखीव ठेवण्यास शासनाने मंजुरी दिल्यानंतर याविरुद्ध ग्रामीण भागात तीव्र संताप वाढू लागला आहे. ठिकठिकाणी विरोध होत असून, दोन दिवसांपूर्वी तेल्हारा तालुक्यात एका कार्यक्रमासाठी आलेल्या स्थानिक आमदारांवर शेतकऱ्यांनी प्रश्‍नांचा भडिमार केल्याची घटना समोर आली.

तेल्हारा तालुक्यात वारी हनुमान येथे वान प्रकल्प असून यातील पाणी २४ दलघमी पाणी अकोला महानगरासाठी आरक्षित करण्यात आले आहे. याबाबत शासन मंजुरीचे पत्र सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. हे पाणी आरक्षण वाचल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये आक्रोश वाढत आहे. हा प्रकल्प सिंचनाच्या उद्देशाने निर्माण झालेला असून, आतापर्यंत विविध योजनांसाठी पाणी नेण्यात आले. आता अकोल्याला तब्बल २४ दलघमी पाणी आरक्षित केल्यास सिंचनालाही पाणी मिळणार नसल्याची भावना तयार झाली आहे. वान प्रकल्पाची ८३.४७ दलघमी क्षमता आहे. गेल्या अनेक वर्षांत या प्रकल्पातील गाळ काढलेला नसल्याने क्षमता कमी झाली. 

सोबतच या प्रकल्पावरून अकोला व बुलडाणा जिल्ह्यांतील असंख्य गावांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी योजना सुरू झालेल्या आहेत, असे असताना आता पुन्हा अकोला महानगरासाठी २४ दलघमी पाण्याचा साठा आरक्षित करण्यास शासनाने मंजुरी दिल्याने रोष वाढला आहे. यंदा या भागातील इतर प्रकल्पांना पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र मध्य प्रदेश तसेच सातपुड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे वान प्रकल्प तुडुंब भरलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या. येत्या रब्बीत तसेच उन्हाळी पिकांसाठी पाणी मिळेल अशी शक्यता वाटू लागली. परंतु अकोल्याला २४ दलघमी पाणी दिल्यास सिंचनासाठी पाणी मिळणे कठीण होईल, असा समज निर्माण झाला आहे. यामुळे आता गावागावांत विरोधाची धार वाढते आहे.

...तर ५७.८७ दलघमी पाणीसाठा पिण्यासाठीच
सद्यःस्थितीत वान प्रकल्पातून ७ पाणीपुरवठा योजनांना पाणी पुरवण्यात येते. त्यामध्ये आकोट शहर पाणीपुरवठ्यासाठी ८.६६ दलघमी, तेल्हारा शहर पाणीपुरवठा ३.१६ दलघमी, ८४ खेडी पाणीपुरवठा ४.२३ दलघमी, शेगाव शहर पाणीपुरवठा ५.६२ दलघमी, खारपाण पट्ट्यातील १४० गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस ८.४५द लघमी, १५९ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला ३.७५ दलघमी पाणी दिले जाते. आता त्यामध्ये आणखी २४ दलघमी आरक्षित केले आहे. यामुळे प्रकल्पात ५७.८७ दलघमी साठा पिण्यासाठी राखीव झाला आहे. सिंचनासाठी नाममात्र पाणी शिल्लक राहत आहे. त्यातही बाष्पीभवनामुळे पाणी कमी होते.  
 

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...
पावसामुळे भात उत्पादक धास्तावलेपुणे : दोन ते तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ५...नांदेड : विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड, परभणी,...
बुलडाणा जिल्ह्यात २० लाख ३९ हजार मतदार...बुलडाणा : जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, मलकापूर,...
वाशीम जिल्ह्यात विधानसभेसाठी आज मतदानवाशीम : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी...
रत्नागिरी जिल्ह्यातील पावसामुळे भातशेती...रत्नागिरी ः गेली चार ते पाच दिवस जिल्ह्यात...
सोयाबीन भिजल्याने वाढल्या अडचणीअमरावती ः शेतात सोंगून ठेवलेले सोयाबीन दोन...
नगर : दोन दिवसांपासून जिल्हाभरात...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून...
सातारा जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊससातारा : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी...
पावसाने कऱ्हाड-पाटणच्या शेतकऱ्यांचा...कऱ्हाड, जि. सातारा ः मुसळधार पावसाने कऱ्हाड-पाटण...
सुप्रसिद्ध पैलवान दादू चौगुले यांचे निधनकोल्हापूर : हिंदकेसरी, रुस्तुम ए हिंद, महाराष्ट्र...
उजनी धरणातून भीमा नदीत पुन्हा ३० हजार...सोलापूर  ः पुणे जिल्ह्यात पावसाने पुन्हा...
राजापूर, रत्नागिरी, संगमेश्‍वर...रत्नागिरी  ः राजापूर, रत्नागिरीसह संगमेश्‍वर...
कापूस उत्पादकता वाढीसाठी शासनाने...अकोला : महाराष्ट्रात कापूस लागवड क्षेत्र...
पुणे जिल्हयात हलक्या ते मध्यम पावसाची...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...
मंगळ, चंद्रसदृश मातीमध्ये पिकांचे...नासा या अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेने चंद्र आणि...
पुणे जिल्ह्यात तीन लाख हेक्टरवर रब्बी...पुणे : मॉन्सूनच्या अंतिम टप्प्यातील पावसाने...
नगर जिल्हा परिषदेमध्ये दूरध्वनीवरील...नगर  : पाणी येत नाही. शिक्षक शाळेत उशिरा...
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारतोफा...मुंबई : चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी...