agriculture news in marathi, Turning the Yarn Business to GST ः Anasaheb Dange | Agrowon

जीएसटीमुळे सूत उद्योग अडचणीत ः अण्णासाहेब डांगे
टीम अॅग्रोवन
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

इस्लामपूर, जि. सांगली ः अठरा टक्के जीएसटी सूतगिरण्यांच्या बोकांडीवर बसल्याने सूत उद्योग अडचणीत अाले आहे. विदर्भाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी सरकार पश्‍चिम महाराष्ट्रावर अन्याय करीत आहे. सरकारच्या दुटप्पी भूमिकेमुळे सूतगिरण्या अडचणीत आल्या आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रातील लोकांना व्यवसाय करू द्यायचा नाही, ही या सरकारची नीती असल्याचा आरोप दीनदयाळ सूतगिरणीचे संस्थापक माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी केला.

इस्लामपूर, जि. सांगली ः अठरा टक्के जीएसटी सूतगिरण्यांच्या बोकांडीवर बसल्याने सूत उद्योग अडचणीत अाले आहे. विदर्भाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी सरकार पश्‍चिम महाराष्ट्रावर अन्याय करीत आहे. सरकारच्या दुटप्पी भूमिकेमुळे सूतगिरण्या अडचणीत आल्या आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रातील लोकांना व्यवसाय करू द्यायचा नाही, ही या सरकारची नीती असल्याचा आरोप दीनदयाळ सूतगिरणीचे संस्थापक माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी केला.

येथील दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या २३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्ष हणमंतराव सूर्यवंशी अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष प्रकाश बिरजे, एक्‍झिक्‍युटिव्ह डायरेक्‍टर ॲड. चिमण डांगे, माजी आमदार भगवानराव साळुंखे, सी. बी. पाटील, विजयभाऊ पाटील, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, सुरेखाताई जाधव, संभाजी कचरे प्रमुख उपस्थित होते.

डांगे म्हणाले, ‘विदर्भ मराठवाड्यापेक्षा येथे वीजदर जास्त आहे. सुताचे भाव कापसापेक्षा कमी झाल्याने अडचणी वाढल्या. जीएसटी, सूत धंद्यात असणारी जागतिक मंदी यामुळे कापसाचा ढासळलेला दर्जा व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यातील सूतगिरण्या अडचणीत आल्या आहेत. या वेळी भगवानराव साळुंखे, सी. बी. पाटील, चिमण डांगे, दादासाहेब पाटील, संपतराव पाटील, बाबूराव हुबाले, धनपाल माळी, मुकुंद कांबळे, वैभव पवार, अविनाश खरात, सुमंत महाजन उपस्थित होते. ए. के. पाटील, बजरंग पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

आदर्श कामगारांचे सत्कार
आदर्श कामगार पुरस्काराचे वितरण अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये संतोष माने, दिलीप माळी, लालासाहेब मुजावर, रबुल हक्‍क, प्रदीपकुमार शाहू, जितेंद्र पटेल यांना सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

इतर बातम्या
वणव्यामुळे पतंग, वनस्पतींच्या प्रजाती...जंगलामध्ये लागणाऱ्या वणव्याचे परागीकरण करणाऱ्या...
दुष्काळी स्थितीमुळे संत्रा बागांचे...शेलूबाजार जि. वाशीम ः निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे...
नांदेड, परभणी जिल्ह्यांतील अकरा मंडळांत...नांदेड :  नांदेड, परभणी जिल्ह्यांतील ११...
कोल्हापूर जिल्ह्यातील धरणे निम्मी भरली कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
नाशिक जिल्ह्यात पावसाचे पुनरागमननाशिक : जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे...
वाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७...वाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र...
रत्नागिरीतील आठ धरणांची होणार तपासणीरत्नागिरी : ‘‘तिवरे धरण फुटल्यानंतर जिल्ह्यातील...
साक्री तालुक्यात दुष्काळाची शक्यतासाक्री, जि. धुळे : पाण्याचे स्रोत आटत आहेत. पाऊस...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...