Agriculture news in marathi Turnover of 300 crores rupees stopped in Sangli from two weeks | Agrowon

सांगलीत शेतीमालाची ३०० कोटींवर उलाढाल ठप्प

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

‘कोरोना’चा प्रसार रोखला जावा, यासाठी बाजार समितीने सर्व शेतीमालाचे सौदे बंद ठेवले आहेत. शेतकरी, व्यापारी, हमाल आदींना फटका बसला आहे. ‘कोरोना’चा प्रसार रोखल्यावरच सौदे सुरू होतील. 
- दिनकर पाटील, सभापती, सांगली बाजार समिती. 
 

सांगली : 'कोरोना'चा प्रसार रोखला जावा, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेती मालाचे सौदे बंद ठेवले आहेत. दोन आठवड्यात ३०० कोटीहून अधिक रकमेची उलाढाल ठप्प झाली आहे. अत्यावश्‍यक सेवेमुळे मार्केट यार्डातील धान्य आणि किराणा मालाची दुकाने मात्र सुरू ठेवली आहेत. 

‘कोरोना'च्या सावटामुळे गर्दी करू नका, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तरीही काही व्यापाऱ्यांनी सुरवातीला बेदाणा सौदे घेण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नोटीस बजावल्यामुळे तो अयशस्वी झाला. त्यानंतर जिल्ह्यात ‘कोरोना' चे रूग्ण आढळल्यामुळे संचारबंदी लागू करण्यात आली. जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या. 

मार्केट यार्डात हळद, गुळ, बेदाणा आदी शेतीमालाचे सौदे काढण्यात येतात. त्यासाठी बाहेरून व्यापारी, शेतकरी मोठ्या संख्येने येतात. सौदे बंद ठेवण्याची मागणी काही व्यापारी आणि शेतकऱ्यांनी केली होती. बाजार समितीने १८ मार्चपासून शेतमालाचे सौदे बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गेले दोन आठवडे सौदे बंद आहेत. 

बाजार समितीची रोजची उलाढाल सुमारे वीस ते पंचवीस कोटी रूपये होते. १३ दिवसांत हळद, बेदाणा आणि गुळाचे सौदे बंद राहिले. त्यामुळे सुमारे तीनशे कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. १४ एप्रिलपर्यंत ‘लॉक डाऊन' जाहीर केला आहे. 

अत्यावश्‍यक सेवेमुळे मार्केट यार्डातील धान्याची सर्व दुकाने, किराणा साहित्य मिळणारी दुकाने सुरू आहेत. किरकोळ दुकानदार तेथून माल खरेदी करत आहेत. 

 


इतर ताज्या घडामोडी
केळी पिकातील कंद कुजव्या रोगाचे...कंदकुजव्या रोगाचा प्राथमिक प्रसार रोगट कंदापासून...
वाढवा जमिनीतील सेंद्रिय कर्ब...जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी...
कृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...
निकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...
नांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...
हिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली  ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
पूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...
निर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...
लातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...
मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त...मराठवाड्यातील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असून...
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...