agriculture news in Marathi turnover of crores stopped from cattle market Maharashtra | Agrowon

कोल्हापूर : जनावरे बाजारातील कोट्यवधींची उलाढाल ठप्प

टीम अॅग्रोवन
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

`कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे जनावरे बाजार बंद असल्याने जिल्ह्यातील जनावरे बाजारातील कोट्यवधींची उलाढाल थंडावली आहे. 

कोल्हापूर: `कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे जनावरे बाजार बंद असल्याने जिल्ह्यातील जनावरे बाजारातील कोट्यवधींची उलाढाल थंडावली आहे. गेल्या चार महिन्यांपासून जनावरांचे आठवडे बाजार ओस पडले आहेत. जिल्ह्यात कोपार्डे, मुरगुड, पेठवडगाव, इचलकरंजी आदी ठिकाणी जनावरांचे बाजार भरतात. खरिपाच्या पार्श्वभूमीवर जनावरांची मोठी उलाढाल जून-जुलै महिन्यात होत असते. आता ऐन खरीप हंगामात जनावरे खरेदी-विक्री थंडावली आहे. जनावरे खरेदी विक्रीसाठी शेतकऱ्यांची धावाधाव होत आहे.

जून महिन्यापासून म्हशीच्या बाजारात उलाढाल वाढते. पावसाळ्यात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता अधिक असते. यामुळे शेतकरी या कालावधीतच जुनी जनावरे विकून नव्याने खरेदी करतात. नव्याने दूध व्यवसायात उतरणारेही या कालावधीतच म्हशी घेऊन व्यवसायाची सुरुवात करतात.  मुऱ्हा, पंढरपुरी यासह स्थानिक जातीच्या म्हशी, खिलार बैलासाठी जिल्ह्यातील बाजार प्रसिद्ध आहेत.

चाळीस ते दीड लाख रुपयांपर्यंत म्हशीचे दर आहेत. मार्च मध्यापासून ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर जनावरांचे बाजार बंद आहेत. खरीप हंगामासाठी बैलजोड्या खरेदी करण्याकरिता शेतकऱ्यांना अडचणी आल्या. आताही बाजार बंद असल्याने म्हशी कशा खरेदी करायच्या, हा प्रश्‍न आहे. सध्या व्हॉटसअपद्वारे तुरळक व्यवहार सुरू आहेत.

ऐन हंगामातच जनावरांचा बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. पर्याय नसल्याने दूध उत्पादकांना २० ते ३० टक्के अधिक दराने म्हशी खरेदी कराव्या लागत आहेत. 
- संजय जरळी, दूध उत्पादक, गडहिंग्लज, जि. कोल्हापूर.


इतर अॅग्रो विशेष
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...
पावसाचे धुमशान सुरुच पुणे   ः राज्यातील काही भागांत...
जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...
निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...