agriculture news in marathi, turnover decrease of turmaric and jaggary, sangli, maharashtra | Agrowon

सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल २७० कोटींनी घटली
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 एप्रिल 2019

बाजार समिती बंद होऊ नये यासाठी आम्ही काळजी घेतली आहे. तसेच शेतीमालाची आवक झाल्यावर लगेच वजन आणि पट्टी देण्याचे नियोजन करत आहे. यासाठी नवीन जमीन घेऊन त्या ठिकाणी सौदे केले जाणार आहे.
- दिनकर पाटील, सभापती, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती

सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा दिल्यामुळे त्यांनी संप केला होता. परिणामी सौदे बंद असल्याने गुळाची गुऱ्हाळ घरावरून वाढती खरेदी आणि हळदीचा उतार कमी व मंदीचा फटका, यामुळे २०१८-१९ मध्ये सांगली बाजार समितीतील हळद आणि गुळाची उलाढाल सुमारे २७० कोटींनी कमी झाली आहे. याचा बाजार समितीच्या सेसवर परिमाण होणार असल्याने बाजार समितीला सुमारे दीड कोटी रुपयांहून अधिक रकमेचा फटका बसला आहे. 

सांगली बाजार समिती राज्यातील मोठी बाजारपेठ आहे. ही शेतीमालाची प्रमुख उतारपेठ आहे. बाजार समितीच्या अंतर्गत आवारामध्ये शेतीमालाची सुमारे दोन हजार कोटींहून अधिक उलाढाल असते. बाजार समितीत २०१७-१८ च्या तुलनेत २०१८-१९ मध्ये हळदीची आवक ३ लाख ४८ हजार क्विंटल तर गुळाची आवक १ लाख ४७ हजार क्विंटलने कमी झाली आहे. याचा परिमाण थेट बाजार समितीला मिळणाऱ्या सेसवरदेखील झाला आहे. बेदाणा नियमनमुक्त असतानाही सांगली बाजारात समितीत बेदाण्याची आवक वाढली असल्याचे चित्र आहे. 

गुळाची खरेदी थेट गुऱ्हाळ घरावरून 
येथील बाजार समितीत कर्नाटकातील रायबाग, गोकाक, अथणी, हारुगिरी आदी भागातून गुळाची मोठ्या प्रमाणात आवक होते. गुजरात आणि राजस्थान या राज्यात येथील व्यापाऱ्यांकडून गूळ रवाना होतो. परंतू राजस्थान, गुजरात आणि आंध्र प्रदेशमधील व्यापाऱ्यांनी थेट गुऱ्हाळ घराकडे धाव घेतली आहे. गुऱ्हाळ घरावर बाजार समितीपेक्षा चारशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटलने दर कमी मिळत आहे. त्यामुळे गुळाची थेट गुऱ्हाळ घरावरून खरेदी होण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच कर्नाटकातील गूळ कोल्हापूर मार्केटकडे जाऊ लागला आहे. तसेच गूळ उत्पादन करणाऱ्या भागातही साखर कारखाने वाढले, याचा सर्व परिणाम सांगली बाजार समितीवर होऊ लागला आहे. 

हळदीचा उतारा कमी; मंदीचा फटका 
सांगली मार्केटमध्ये महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा या ठिकाणाहून हळदीची आवक होते. हळदीसाठी ही मोठी बाजारपेठ आहे. याच बाजारपेठेवरून देशातील हळदीचे दर ठरतात. परंतू यंदा देशात हळदीच्या लागवडीत वाढ झाली असली तरी रोगाचा प्रादुर्भाव आणि पाण्याची कमतरता यामुळे हळदीच्या उताऱ्यात घट झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यातच गेल्या चार ते पाच वर्षांपासून हळदीला प्रति क्विंटलला ९ हजार ते ९५०० रुपये असा दर मिळतोय. हळदीच्या दरात तेजी मंदी होणार नसल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले. काही भागात व्यापाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांकडून हळद खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. याचा परिमाण हळदीच्या आवकेवर झाला आहे. वास्तविक पाहता २०१७-१८ मध्ये हळदीची आवक १५ लाख क्विंटल होती. २०१८-१९ मध्ये ११ लाख ५५ हजार क्विंटल आवक झाली आहे. अर्थात ३ लाख ४८ हजार क्विंटलने हळदीची आवक घटली आहे. 

 

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक झालेला शेतीमाल (क्विंटलमध्ये)
शेतीमाल  २०१६-१७ २०१७-१८ २०१८-१९ वाढ(+) घट (-) 
बेदाणा ४,३४,१५१ २,४४,४५४ ३,६५,१३३ (+) २०,६७९ 
हळद ३,२०,१४९ १५,०३,५९६  ११,५५,५५१ (-) ३,४८,०४५ 
गूळ रवे ३,१८,४५९  ३,८३,३३१ ३,५७,१८७  (-) २६१५३ 
गूळ भेली  ६,१२,२५३  ७,३६,०२८  ६,१४,४८८  (-)१,२१,५४०
लाल मिरची ३१,५७८  ३३,६२६  १५,३६०  (-) १८,२६६

 

इतर बातम्या
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे...औरंगाबाद :  जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार...
अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने...अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ धरणे भरलीसिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २३...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...
दसरा, दिवाळीसाठी चांदवड तालुक्यात...नाशिक  : चांदवड तालुक्यातील शेतकरी दसरा,...
नगर जिल्ह्यातील वाहून गेलेल्या...नगर : पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या जमिनीचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सिंधुदुर्ग   ः अतिवृष्टीचा भाजीपाला...
महापुराच्या स्थितीतही ‘त्यांनी’ तीन...नवेखेड, जि. सांगली  : मसुचिवाडी (ता....
वसंतराव नाईक यांनी आधुनिक तंत्रज्ञान...पुसद, जि. यवतमाळ   ः देशातील...
सरकारला खरीप, रब्बीतील फरक कळत नाही :...पैठण, जि. औरंगाबाद  : राज्यातील शेतकऱ्यांची...
पूरग्रस्त भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी...मुंबई  : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून...
पीक नुकसानभरपाई नको; संपूर्ण कर्जमाफीच...कऱ्हाड, जि. सातारा   ः महापुराने हुती...
नगर जिल्ह्यात ४०५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर  ः जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने...
पूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...
राज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...
‘दावणीची दौलत’ चाऱ्याअभावी खचली; दक्षिण...कोल्हापूर/ सांगली : बारमाही पाण्याने भरलेल्या...