औरंगाबादमध्ये थेट शेतमाल विक्रीची उलाढाल २४ कोटींवर

जिल्ह्यातील विविध शहरांसह औरंगाबाद शहरात मार्च २०२० पासून सुरू झालेली फळे, भाजीपाला धान्य थेट विक्रीची उलाढाल १७ जानेवारी अखेर २४ कोटी २३ लाख ५३ हजार १५२ रुपयांवर पोहोचली आहे.
Turnover of direct sale of agricultural commodities in Aurangabad is over 24 crores
Turnover of direct sale of agricultural commodities in Aurangabad is over 24 crores

औरंगाबाद : जिल्ह्यातील विविध शहरांसह औरंगाबाद शहरात मार्च २०२० पासून सुरू झालेली फळे, भाजीपाला धान्य थेट विक्रीची उलाढाल १७ जानेवारी अखेर २४ कोटी २३ लाख ५३ हजार १५२ रुपयांवर पोहोचली आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर औरंगाबाद शहरात लॉकडाउन काळात शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी व वैयक्तिक शेतकऱ्यांच्या माध्यमातून ग्राहकांना थेट फळे, भाजीपाला व धान्य विक्रीची संकल्पना पुढे आली. आत्मा, कृषी विभाग, महसूल, पोलिस, सहकार विभागाच्या समन्वयातून शेतकऱ्यांची थेट ग्राहकांची सांगड घालून थेट शेतीमाल विक्रीला चालना देण्यात आली.

ग्राहकांचा प्रतिसाद मिळत गेल्याने सुरुवातीला दहा-बारा शेतकरी गट व शेतकरी यांच्या सहभागातून सुरू झालेला थेट शेतीमाल विक्रीतील शेतकऱ्यांचा सहभाग तब्बल ७७ शेतकरी, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. या ७७ शेतकरी, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून २९ मार्च २०२० ते १७ जानेवारी २०२१ या दरम्यान २१ हजार ९०० किलो धान्य, ८१ लाख ७१ हजार ३६३ किलो फळे, तर १ कोटी किलोवर भाजीपाल्याची थेट ग्राहकांना विक्री करण्यात आली आहे.

औरंगाबाद तालुक्यात एकूण फळे भाजीपाला विक्रीतून २ कोटी ७५ लाख ६६ हजार ४६० रुपयांची उलाढाल झाली. पैठण तालुक्यात २ कोटी ४० लाख ४२ हजार ६८७ रुपये, फुलंब्री तालुक्यात १ कोटी ७८ लाख १५ हजार ४२२ रुपये, वैजापूर तालुक्यात १ कोटी ९४ लाख २९ हजार ३४९ रुपये, गंगापूर तालुक्यात ३ कोटी ९२ लाख ९१ हजार ९४० रुपये, खुलताबाद तालुक्यात १ कोटी २३ लाख १२ हजार ९८० रुपये, सिल्लोड तालुक्यात २ कोटी २६ लाख ९७ हजार ९३७ रुपये, कन्नड तालुक्यात २ कोटी ७ लाख ३० हजार ३७० रुपये, सोयगाव तालुक्यात १ कोटी ५२ लाख ६७ हजार ७९४ रुपयांची उलाढाल झाली आहे. जालना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने वीस हजार किलो फळे विकून जवळपास ६ लाख रुपयांचे योगदान शेतकरी ते ग्राहक थेट फळे भाजीपाला धान्य विक्रीच्या उलाढालीत दिले असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com