औरंगाबाद जिल्हाभरात फळे, भाजीपाला थेट विक्रीची उलाढाल ३० कोटींवर

औरंगाबाद : शहरासह जिल्हाभरात राबविल्या जात असलेल्या फळे-भाजीपाला थेट विक्री उपक्रमातील उलाढाल ३० कोटींवर पोहोचवली आहे.
Turnover of direct sale of fruits and vegetables in Aurangabad district is over 30 crores
Turnover of direct sale of fruits and vegetables in Aurangabad district is over 30 crores

औरंगाबाद : शहरासह जिल्हाभरात राबविल्या जात असलेल्या फळे-भाजीपाला थेट विक्री उपक्रमातील उलाढाल ३० कोटींवर पोहोचवली आहे. या उपक्रमात ७७ शेतकरी गट शेतकरी शेतकरी उत्पादक कंपन्या सहभागी झाल्या आहेत. 

गतवर्षी मार्चमध्ये कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांद्वारे भाजीपाला व फळे थेट ग्राहकांना विक्रीचा उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमाची सुरवात कमी शेतकरी सहभागातून झाली असली, तरी आताच्या घडीला या उपक्रमात जवळपास ७७ शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी सहभागी झाल्या आहेत. 

औरंगाबाद शहरातून सुरू झालेली थेट विक्री आता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणांसह काही मोठ्या शहरवजा खेड्यांमध्येही सुरू झाली आहे. जवळपास एक वर्षापासून सातत्याने हा उपक्रम राबविला जात आहे. त्यामुळे उत्पादित शेतीमालाची थेट विक्री करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम एक संधीच ठरला आहे. 

२९ मार्च २०२० पासून सुरू या उपक्रमाद्वारे आतापर्यंत १ कोटी १२ लाख ७५ हजार ४७३ किलो भाजीपाला व ९१ लाख ४३ हजार ३३ किलो फळांची, ४७ हजार ३०० किलो इतर धान्याची विक्री केली आहे. त्याद्वारे २० एप्रिल अखेरपर्यंत जवळपास ३० कोटी ३२ लाख ६५ हजार ४८२ रुपयांची उलाढाल झाली. १७ ते १९ एप्रिल दरम्यान ३८ हजार २९० किलो भाजीपाला व ३४ हजार ९९० किलो फळांची, १२०० किलो इतर धान्याची विक्री झाली. त्यातून २१ लाख ६० हजार रुपयांची उलाढाल झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com