आंबा महोत्सवात १४ कोटींची उलाढाल

गेली १८ वर्षांपासून पणन मंडळ आंबा महोत्सवाचे आयोजन करत आहे. महोत्सवामध्ये ग्राहकाला विश्‍वासार्ह आणि दर्जेदार हापूस आंबा मिळतो. यामुळे ग्राहक आणि शेतकऱ्यांमध्ये ऋणानुबंध निर्माण झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना देखील चांगला दर मिळत आहे. महोत्सवात कोकणातील ३३० तर मराठवाड्यातील ३७ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. - सुनील पवार, कार्यकारी संचालक, पणन मंडळ.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः शेतकरी ते ग्राहक थेट विक्री योजनेअंतर्गत राज्य कृषी पणन मंडळाने आयोजित करण्यात आलेल्या आंबा महोत्सवात सुमारे १४ कोटींची उलाढाल झाली असल्याची माहिती मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली. कोकणातील ३३० हापूस आंबा उत्पादक, तर मराठवाडा तसेच स्थानिक ३७ केसर आंबा उत्पादक या महोत्सवात सहभागी झाले होते. 

यंदा पुण्यासह राज्यात २४ ठिकाणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. केवळ पुण्यातील महोत्सवात कोकणातील ३३० हापूस आंबा उत्पादकांनी तर मराठवाडा तसेच स्थानिक ३७ केसर आंबा उत्पादकांनी महोत्सवात भाग घेतला होता. या शेतकऱ्यांना सुमारे अडीच लाख डझन आंबा विक्री केली. कोकणातील हापूस आंबा विक्रीमध्ये मोठ्याप्रमाणवर फसवणुकीच्या घटना घडत आहे. कोकण हापूसच्या नावाखाली कर्नाटक हापूसची मोठ्या दराने विक्री होत ग्राहकांची फसवणूक होत आहे. हे टाळण्यासाठी थेट शेतकऱ्यांकडून विश्‍वासार्ह आंबा ग्राहकांना या महोत्सवाद्वारे उपलब्ध होत असल्याचे श्री. पवार यांनी नमूद केले.  

हंगामाच्या प्रारंभाला आवक कमी असल्याने फळाच्या आकार आणि दर्जानुसार दर ७००-९०० रुपये प्रती डझन होते. अक्षय तृतीयेनंतर हापूस आंब्याची आवक वाढली. परंतु, ग्राहकसंख्याही वाढली व त्यामुळे दरामध्ये फारसा फरक पडला नाही. साधारणतः २० मे नंतर आवक जास्त वाढल्याने आंब्याचे दर प्रती डझन ४००-६०० रुपये होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com