औरंगाबादमध्ये थेट फळे, भाजीपाला विक्रीतून दोन कोटींची उलाढाल

औरंगाबाद : शेतकरी ते ग्राहक थेट विक्री उपक्रमांतंर्गत जिल्हाभरातील विविध शेतकरी, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी थेट ग्राहकांना जवळपास दोन कोटी ७ लाख रुपयांच्या फळे, भाजीपाल्याची विक्री केली.
Turnover of Rs 2 crore from direct sale of fruits and vegetables in Aurangabad
Turnover of Rs 2 crore from direct sale of fruits and vegetables in Aurangabad

औरंगाबाद : शेतकरी ते ग्राहक थेट विक्री उपक्रमांतंर्गत जिल्हाभरातील विविध शेतकरी, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी थेट ग्राहकांना जवळपास दोन कोटी ७ लाख रुपयांच्या फळे, भाजीपाल्याची विक्री केली. औरंगाबाद शहरासोबतच तालुकास्तरावरही फळे, भाजीपाला विक्री करण्याचा प्रयत्न शेतकरी, शेतकरी गट व कंपन्यांनी केला आहे. 

‘लॉकडाउन’मुळे नाशवंत फळे, भाजीपाल्याच्या विक्रीचा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यावर उपाय म्हणून २९ मार्चपासून शहरातील विविध भागात शेतकरी ते ग्राहक थेट विक्री उपक्रमांतर्गत कृषी विभागाच्या नियंत्रणात शेतकरी गटांच्या सहभागातून थेट ग्राहकांना विक्री सुरू करण्यात आली. २१ पासून झालेल्या या उपक्रमात आजवर जवळपास ६६ शेतकरी, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्या सहभागी झाल्या. शेतकऱ्यांनी तालुकास्तरावर विक्री सुरू केली. ५ मे रोजी जवळपास २० लाख ६३ हजार ७२० रुपयांचा फळे, भाजीपाला थेट ग्राहकांना विकला गेला. 

२९ मार्चपासून ५ मेपर्यंत जवळपास ४ लाख ३५ हजार ९९७ किलो भाजीपाला व ६ लाख ६९ हजार १२४ किलो फळांची शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांना विक्री केली. त्याची उलाढाल ५ मे अखेर २ कोटी ७ लाख ४४ हजार ५३० रुपयांवर पोचली होती. ५ मे रोजी तालुकास्तरावर विक्री झालेल्या फळे, भाजीपाल्याच्या उलाढालीनुसार औरंगाबाद तालुक्यात १ लाख १० हजार रुपये, पैठण १ लाख ४२ हजार रुपये, फुलंब्री ८२ हजार २०० रुपये, वैजापूर २ लाख २५ हजार ८३० रुपये, गंगापूर ६ लाख ८० हजार रुपये, खुलताबाद ३६ हजार रुपये, सिल्लोड ६४ हजार ६०५ रुपये, कन्नड २ लाख ८५ हजार रुपये, तर सोयगाव तालुक्यात ६६ हजार ७८० रुपयांची विक्री झाली, अशी माहिती कृषी विभागाने दिली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com