हमीभावाने तूर खरेदीसाठी प्रतिहेक्टरी उत्पादकता निश्चित

हमीभावाने तूर खरेदीसाठी प्रतिहेक्टरी उत्पादकता निश्चित
हमीभावाने तूर खरेदीसाठी प्रतिहेक्टरी उत्पादकता निश्चित

परभणी : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत २०१९-२० च्या हंगामात शासकीय केंद्रांवर हमीभावाने तूर खरेदीसाठी राज्यातील ३४ जिल्ह्यांची प्रतिहेक्टरी उत्पादकता निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार तूर खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यंदा लातूर जिल्ह्यासाठी सर्वाधिक ११ क्विंटल १३ किलो तर सांगली जिल्ह्यासाठी सर्वात कमी २ क्विंटल ५७ किलो क्विंटल एवढी निश्चित करण्यात आली आहे.  राज्यामध्ये नाफेड तर्फे मार्केटिंग फेडरेशन आणि विदर्भ मार्केटिंग को ऑपरेटीव्ह फेडरेशन यांच्यामार्फेत किमान आधारभूत योजनेअंतर्गत हमीभावाने (प्रतिक्विंटल ५८०० रुपये) तूर खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. त्यासाठी शासनाने जिल्हानिहाय उत्पादकतेनुसार तूर खरेदीसाठी मर्यादा निश्चित केली आहे. हमीभावाने खरेदीसाठी तुरीच्या लागवडीखालील पूर्ण क्षेत्र गृहित धरून उत्पादकता निश्चित करून त्याप्रमाणे खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गतवर्षी (२०१८-१९) हमीभावाने तूर खरेदीसाठी परभणी जिल्ह्यासाठी प्रतिहेक्टरी उत्पादकता ५ क्विंटल, हिंगोली जिल्हा ४ क्विंटल १० किलो, नांदेड जिल्ह्यासाठी प्रतिहेक्टरी ४ क्विंटल ८८ किलो एवढी होती. यंदा परभणी जिल्ह्यासाठी प्रतिहेक्टरी ७ क्विंटल ३७ किलो, हिंगोली जिल्ह्यासाठी ६ क्विंटल १५ किलो, नांदेड जिल्ह्यासाठी ५ क्विंटल ८९ किलो एवढी आहे. यंदा कृषी विभागाच्या प्रथम अंदाजानुसार राज्यातील ३४ जिल्ह्यांतील तुरीची उत्पादकता निश्चित करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्याची उत्पादकता सर्वाधिक म्हणजे ११ क्विंटल १३ किलो, तर सांगली जिल्ह्याची उत्पादकता सर्वात कमी म्हणजे २ क्विंटल ५७ क्विंटल एवढी आहे. जिल्हानिहाय तूर उत्पादकता... सन २०१९-२० साठी हमीभावाने तूर खरेदीसाठी निश्चित केलेली जिल्हानिहाय प्रतिहेक्टरी उत्पादकता (क्विंटलमध्ये):  परभणी ७.३७, हिंगोली ६.१५, नांदेड ५.८९, लातूर ११.१३, उस्मानाबाद ४.६८, बीड ३.८१, जालना ६.१३, औरंगबाद ५.४५, बुलडाणा ६.०९, अकोला ९.६६, वाशीम ४.७८, अमरावती ८.५४, यवतमाळ ६.९६, वर्धा ११.०२, नागपूर ९.०८, भंडारा ८.६०, गोंदिया ९.१०, चंद्रपूर १०.३९, गडचिरोली ८.५१, नाशिक ४.८८, धुळे ६.२१, नंदूरबार ३.७७, जळगाव ६.६४, नगर ५.२०, पुणे ४.९१, सोलापूर ३.८२, सातारा ३.५१, सांगली २.५७, कोल्हापूर ४, रत्नागिरी ४.११, रायगड ५.७२, पालघर ५.११, ठाणे ४.४०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com