मराठवाड्यात सव्वापाच हजार एकरवर तुती लागवडीचे उद्दीष्ट 

रेशीम उद्योग शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला गती देण्यात यशस्वी ठरला आहे. येत्या हंगामासाठीचे ५ हजार १९९ एकरवर तुती लागवडीचे उद्दिष्ट ठेऊन रेशीम विभागाचे नियोजन सुरू आहे. - दिलीप हाके, उपसंचालक रेशीम, मराठवाडा विभाग.
tuti
tuti

औरंगाबाद: मराठवाड्यात २०२०-२१ मध्ये ५ हजार १९९ एकरवर तुती लागवडीचे उद्दिष्ट ठेवून रेशीम विभागातर्फे नियोजन करण्यात येत आहे. आठही जिल्ह्यांत २ हजार एकरवर तुती लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. 

मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी रेशीम उद्योग अनुकूल व प्रतिकूल अशा दोन्ही परिस्थितीत कायम तारणहार ठरला आहे. त्यामुळे सहाजिकच रेशीम उद्योगाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्याचाच परिणाम म्हणून रेशीम विभागाच्या महारेशिम अभियानाला मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडून कायम उदंड प्रतिसाद मिळत आहे. औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद व बीड या जिल्ह्यांसाठी प्रत्येकी ३०० एकर, तर परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांसाठी प्रत्येकी दोनशे एकर तुती लागवडीचा लक्षांक आहे. 

मराठवाड्यातून ८ हजार ८३१ शेतकऱ्यांनी ८८५८ एकरभर तुती लागवड करण्याची तयारी दाखवत अर्ज सादर केले आहेत. त्यानुसार रेशीम विभागातर्फे नियोजन सुरू आहे.  जिल्हानिहाय संभाव्य तुती लागवड (क्षेत्र एकरमध्ये) 

जिल्हा संख्या एकर
औरंगाबाद ११०६  ११०६
जालना ५००  ५०० 
परभणी ३२५  ३२५ 
हिंगोली २६४  २६४ 
नांदेड ३८९  ३८५ 
लातूर ९१६  ९१५ 
उस्मानाबाद ५६१  ५६१ 
बीड. ११३८  ११२६ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com