agriculture news in Marathi tuti plantation may over 5 thousand acer Maharashtra | Page 2 ||| Agrowon

मराठवाड्यात सव्वापाच हजार एकरवर तुती लागवडीचे उद्दीष्ट 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मे 2020

रेशीम उद्योग शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला गती देण्यात यशस्वी ठरला आहे. येत्या हंगामासाठीचे ५ हजार १९९ एकरवर तुती लागवडीचे उद्दिष्ट ठेऊन रेशीम विभागाचे नियोजन सुरू आहे. 
- दिलीप हाके, उपसंचालक रेशीम, मराठवाडा विभाग. 

औरंगाबाद: मराठवाड्यात २०२०-२१ मध्ये ५ हजार १९९ एकरवर तुती लागवडीचे उद्दिष्ट ठेवून रेशीम विभागातर्फे नियोजन करण्यात येत आहे. आठही जिल्ह्यांत २ हजार एकरवर तुती लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. 

मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी रेशीम उद्योग अनुकूल व प्रतिकूल अशा दोन्ही परिस्थितीत कायम तारणहार ठरला आहे. त्यामुळे सहाजिकच रेशीम उद्योगाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्याचाच परिणाम म्हणून रेशीम विभागाच्या महारेशिम अभियानाला मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडून कायम उदंड प्रतिसाद मिळत आहे. औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद व बीड या जिल्ह्यांसाठी प्रत्येकी ३०० एकर, तर परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांसाठी प्रत्येकी दोनशे एकर तुती लागवडीचा लक्षांक आहे. 

मराठवाड्यातून ८ हजार ८३१ शेतकऱ्यांनी ८८५८ एकरभर तुती लागवड करण्याची तयारी दाखवत अर्ज सादर केले आहेत. त्यानुसार रेशीम विभागातर्फे नियोजन सुरू आहे. 

जिल्हानिहाय संभाव्य तुती लागवड (क्षेत्र एकरमध्ये) 

जिल्हा संख्या एकर
औरंगाबाद ११०६  ११०६
जालना ५००  ५०० 
परभणी ३२५  ३२५ 
हिंगोली २६४  २६४ 
नांदेड ३८९  ३८५ 
लातूर ९१६  ९१५ 
उस्मानाबाद ५६१  ५६१ 
बीड. ११३८  ११२६ 

 


इतर अॅग्रो विशेष
यांत्रिकीकरणाचे वास्तव!मागच्या वर्षात (२०२०) भारतात नऊ महिने कडक...
बर्ड फ्लू ः खबरदारी आणि जबाबदारीमार्च-एप्रिल २०२० पासून देशात कोरोनाच्या...
पोखरलेला ‘पोकरा’नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (पोकरा) ...
प्रस्थापितांना दणका; तरुणाईची मुसंडी पुणे : राज्यात सोमवारी (ता. १८) ग्रामपंचायतींच्या...
किमान तापमानात वाढ पुणे ः राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व...
शेतकऱ्यांच्या रॅलीबाबतचा निर्णय ...नवी दिल्ली ः विविध शेतकरी संघटनांकडून प्रजासत्ताक...
गहू, तांदळाच्या दराच्या प्रश्‍नांमुळेच...माळेगाव, जि. पुणे : देशपातळीवर आणि विशेषतः...
निर्यातीची साखर वाहतूक कंटेनर अभावी...कोल्हापूर: केंद्राच्या साखर निर्यात अनुदान...
रंगीत कापसाचा प्रयोग यशस्वीयवतमाळ  ः शेतीचा व्यासंग जपलेल्या मारेगाव...
व्यावसायिक दृष्टिकोनामुळेच यशस्वी...पुणे जिल्ह्यात अति पावसाच्या मावळ तालुक्यातील...
संयुक्त कुटुंबाचे शेती, पूरक उद्योगाचे...यशवंतवाडी (जि. लातूर) येथील पाच भाऊ व एकूण ४०...
बीजमाता राहीबाई पोपेरे करणार लोकसभा...अकोले, जि. नगर : पारंपरिक बियाण्यांची जोपासना...
ऊसतोडणीचा प्रश्‍न गंभीर नाशिक : गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील निफाड...
सोयाबीन विक्रमी टप्पा गाठेल कमी उत्पादन, चांगली निर्यात आणि वाढलेला वापर हे...
कृषी पंढरीतील यात्रेची उत्सुकता शिगेला माळेगाव, बारामती ः येथील कृषी पंढरीत आजपासून (ता....
‘पोकरा’ अनुदानातून अनेक घटक वगळले पुणे : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (...
कृषी आयुक्‍त थेट बांधावर औरंगाबाद : कृषी विभागाच्या क्षेत्रीय भेट व आढावा...
ठिकठिकाणी ढगाळ वातावरण पुणे ः मागील दोन दिवसांपासून अरबी समुद्राच्या...
समविचारी शेतकऱ्यांचे राष्ट्रीय संघटन...नागपूर ः शेती प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी...
दुष्काळी स्थितीतही द्राक्षाने दिले...सांगली जिल्ह्यातील वायफळे (ता. तासगाव) येथील...