agriculture news in Marathi tweeter war on onion issue Maharashtra | Agrowon

कांदाप्रश्नी आता पुन्हा `ट्विटर’ आंदोलन 

टीम अॅग्रोवन
रविवार, 10 मे 2020

महाराष्ट्रातील लाखो कांदा उत्पादक दर नसल्याने अडचणीत आहेत. खर्च करून तो वसूल होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे जोपर्यंत सरकार अडचणीच्या काळात कांदा उत्पादकांचा विचार करत नाही. तसेच ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत सातत्याने हे ट्विट केले जाणार आहे. 
-भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना 

नाशिक: लॉकडाऊन सुरू असल्याने सध्या अनेक बाजार समित्या बंद असून कांद्याला प्रतिकिलो ५ रुपये असा सर्वसाधारण दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल करणे अवघड झाले आहे. या परिस्थितीत कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्राने प्रति २० रुपये किलोप्रमाणे कांदा खरेदी करावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने ‘ट्विटर’ आंदोलन छेडले आहे. 

सध्या जमावबंदी असल्याने थेट रस्त्यावर उतरणे व आंदोलन करण्यास अडचणी आहेत. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादकांनी आंदोलनाची स्मार्ट पद्धत अवलंबून सरकारचे याकडे लक्ष वेधले जाणार आहे. यापूर्वी संघटनेने निर्यात खुली करण्याबाबत अशा पद्धतीने आंदोलन केले होते. आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर, वाणिज्य मंत्री पियुष गोयल, अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान व नितीन गडकरी यांना लक्ष केले जात आहे. 

मागील वर्षाच्या खरीप हंगामापासून कांदा उत्पादक अडचणीत आहेत. खरिपाच्या तोंडावर हातात भांडवल नसल्याने कांदा विक्रीसाठी आणला जात आहे, मात्र त्यातून उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. बाजार समित्याही बहुतांशी बंद आहेत. अशा स्थितीत राज्यातील कांदा उत्पादकांनी कांदा विक्री कसा करायचा याबाबत मोठी समस्या निर्माण झालेली आहे. त्यामुळे या विषयावरही लक्ष द्या, ही भूमिका घेऊन पंतप्रधान, मुख्यमंत्री, कृषिमंत्री यांना ट्विट टॅग करण्यात येत आहे. 

ट्रेंड सुरू 
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने ट्विटरवर कांदा दरवाढीसाठी आंदोलन सुरू केले आहे. या माध्यमातून #purchaseonionsupportfarmers हा हॅशटॅग ट्रेंडिंग केला जातोय. नाशिक, नगर, धुळे, जळगाव जिल्ह्यातील कांदा उत्पादक यात सहभागी होत आहेत. 


इतर ताज्या घडामोडी
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...
अकोटमध्ये अतिवृष्टीने कपाशी पाण्याखालीअकोला ः आजवर झालेल्या सततच्या पावसाने अकोट...
बुलडाण्यातील नुकसानीचे पंचनामे करून...बुलडाणा : पावसामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे...
सातगाव पठारावर नुकसानग्रस्त बटाट्याचे...पुणे :‘‘लांबलेला मॉन्सून, सततचा कोसळणारा वादळी...
गाव पातळीवरील बैठका, सभा तात्पुरती...अकोला ः कोवीड १९ च्या वाढत्या प्रभावामुळे गाव...
नोकर भरतीची वयोमर्यादा वाढवाः...चंद्रपूर : कोरोना संकटामुळे या वर्षात नोकरीकरता...
लातूर, उस्मानाबादेत एक लाख ४१ हजार...उस्मानाबाद / लातूर : लातूर व उस्मानाबाद...
औरंगाबाद, जालन्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड...
मजुरांना कष्टाचे तरी पैसे मिळावेत नगर ः राज्यातील साखर कारखान्यांची तब्बल ८० हजार...
पोषक चाऱ्यासाठी ओट लागवडजनावरांच्या हिरव्या चाऱ्यासाठी अधिक पोषणमूल्य...
राज्यात सोयाबीन २५०० ते ३९७४ रुपये नगरमध्ये ३००० ते ३७०० रुपये  नगर येथील...
कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी पीक नियोजनकोरडवाहू  भागातील जमिनीतील ओलावा हा...
हरभऱ्याच्या अधिक उत्पादनासाठी फुले...महात्मा फुले कृषि विदयापिठाने कंबाईन हार्वेस्टरने...
मानवी आहारासाठी पोषणयुक्त जैवसंपृक्त वाणजैवसंपृक्त पिकांची लागवड केल्यास पौष्टिक व...
सामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण...शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त...