बारावीचा परीक्षेचा निकाल ९०.६६ टक्के

१२ वी चा ऑनलाइन निकालाची घोषणा राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने केली आहे. राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के लागला आहे.
Twelfth standard result of 90.66 percent
Twelfth standard result of 90.66 percent

पुणे ः कोरोना संकटात १२ वी परीक्षेचा निकाल कधी लागणार याची धाकधूक असलेल्या विद्यार्थी आणि पालकांचा अखेर दिलासा मिळाला आहे. १२ वी चा ऑनलाइन निकालाची घोषणा राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने केली आहे. राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के लागला आहे.

कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक ९५.८ टक्के लागला आहे तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वांत कमी (८८.१८ टक्के) आहे. मागील वर्षीच्या तुलनेत निकाल ४.७८ टक्क्यांनी वाढला आहे. यंदाही मुलीच सरस ठरल्या आहेत. ९३.८८ टक्के विद्यार्थिनी तर ८८.०४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू केली होती. या परीक्षेला राज्यभरात एकूण १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंदणी केली होती.

खालील संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहे. www.mahresult.nic.in www.hscresult.mkcl.org www.maharashtraeducation.com

दृष्टिक्षेपात निकाल राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के यंदा निकाल ४.७८ टक्क्यांनी वाढला उत्तीर्णांमध्ये मुलींचीच बाजी उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ९३.८८ टक्के उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८८.०४ टक्के कला : ८२.६३ टक्के वाणिज्य : ९१.२७ टक्के विज्ञान : ९६.९३ टक्के एमसीव्हीसी : ९५.०७ टक्के कोकण विभागाची टक्केवारी सर्वाधिक ९५.८९ टक्के सर्वांत कमी औरंगाबाद विभागाचा निकाल ८८.१८ टक्के

परीक्षेसाठी एकूण विद्यार्थ्यांची नोंदणी १५ लाख ५ हजार २७ यामध्ये विद्यार्थी ८ लाख ४३ हजार ५५२ विद्यार्थिनी ६ लाख ६१ हजार ३२५ एकूण ३ हजार३६ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती.

ऑनलाइन गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन, छायाप्रतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढीलप्रमाणे http://verification.mh-hsc.ac.in गुणपडताळणीसाठी अर्ज - १७ जुलै २०२० ते २७ जुलै २०२० छायाप्रतीसाठी अर्ज - १७ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२०

परीक्षेला बसलेले शाखानिहाय विद्यार्थी
विज्ञान ५,८५,७३६
कला ४,७५,१३४
वाणिज्य ३,८६, ७८
व्होकेशनल ५७,३७३
एकूण १५,०५,०२७
शाखानिहाय निकाल
शाखा टक्के
विज्ञान ९६.९३
कला ८२.६३
वाणिज्य ९१.२७
एमसीव्हीसी ८६.०७
एकूण ९०.६६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com