बारा ॲग्रोवन मार्टसचे राज्यात आज उद्घाटन

ॲग्रोवन ॲग्रोटेक इंडस्ट्रिज प्रा. लि. चा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेली ॲग्रोवन मार्ट ही पुरवठा साखळी गुढी पाडव्याचा योग साधून कार्यान्वित होत आहे.
बारा ॲग्रोवन मार्टसचे राज्यात आज उद्घाटन
बारा ॲग्रोवन मार्टसचे राज्यात आज उद्घाटन

पुणे : ॲग्रोवन ॲग्रोटेक इंडस्ट्रिज प्रा. लि. चा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेली ॲग्रोवन मार्ट ही पुरवठा साखळी गुढी पाडव्याचा योग साधून कार्यान्वित होत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यभरात एकूण ५०१ ॲग्रोवन मार्टची साखळी आकाराला येणार आहे. त्यातील निवडक १२ ॲग्रोवन मार्टसचे उद्घाटन मंगळवारी (ता. १३) सकाळी कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते होणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि राज्य सरकारने लागू केलेले कडक निर्बंध लक्षात घेऊन उद्घाटनाचा कार्यक्रम व्हर्च्युअल माध्यमाद्वारे पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत विविध ठिकाणचे मार्ट पार्टनर्स या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.  माध्यम क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेला सकाळ माध्यम समूह ॲग्रोवन मार्टच्या रूपाने कृषी पुरवठा मूल्य साखळीच्या क्षेत्रात पाऊल टाकत आहे. राज्यात ५०१ ठिकाणी ॲग्रोवन मार्ट सुरू करण्यात येणार आहेत. त्यात ॲग्रोवन मार्ट, मेगा मार्ट आणि मिनी मार्ट यांचा समावेश आहे. विभागीय पातळीवर राज्यात सात ठिकाणी ॲग्रोवन मेगा मार्ट आकाराला येणार आहेत. शेतकऱ्यांच्या नेमक्या गरजा ध्यानात घेऊन ॲग्रोवन मार्टची पुरवठा साखळी उभी राहत आहे. या नव्या सुसज्ज यंत्रणेद्वारे शेतकऱ्यांना उत्कृष्ट गुणवत्तेच्या निविष्ठा रास्त किमतीमध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.  ॲग्रोवन लॅब ॲग्रोवन मार्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ॲग्रोवन लॅबची सुविधाही मिळणार आहे. या लॅबद्वारे माती, पाणी, चारा आणि जनावरांच्या रक्ताची चाचणी करण्याची सोय उपलब्ध असणार आहे. विभागीय पातळीवर राज्यात एकूण सात ॲग्रोवन लॅब सुरू होणार आहेत. शेतकऱ्यांना आपल्या जवळच्या ॲग्रोवन मार्टमध्ये पाणी, माती, चारा तसेच जनावरांच्या रक्ताचे नमुने जमा करण्याची सुविधा प्राप्त होईल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com