पुणे जिल्ह्यातील बारा धरणे तुडुंब

पुणे जिल्ह्यातील बारा धरणे तुडुंब
पुणे जिल्ह्यातील बारा धरणे तुडुंब

पुणे ः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, अनेक भागांत पावसाची संततधार सुरू होती. शुक्रवारी (ता. २) सकाळी आठ वाजेपर्यंत टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक १२३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे ओढे, नाले खळाळून वाहत असून, धरणातील पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील बारा धरणे भरली आहेत. यामध्ये आंध्रा, कळमोडी, पानशेत आणि खडकवासला ही चार धरणे शंभर टक्के भरली असून, उर्वरित आठ धरणे ९० टक्क्यांच्या वर गेली आहेत.  

पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, हवेली आणि उत्तरेकडील खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यांत गेल्या आठवड्यापासून पावसाची संततधार सुरू होती. गुरुवारीही पश्चिमेकडील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्यांत पावसाने दमदार हजेरी लावली. वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ११७ तर, नीरा देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ११५, वडीवळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १०६  मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तर मुळशी, पाणशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ९२, गुंजवणी ८२, पवना ७९, भाटघर ५८, कळमोडी ३५, पिंपळगाव जोगे ३०, डिंभे २६, भामा आसखेड २९ मिलिमीटर पाऊस पडला. उतरपूर्वेकडील तालुक्यात पावसाच्या अधूनमधून सरी बरसत होत्या. त्यामुळे धरणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील चार धरणे शंभर टक्के भरली आहेत. भामा आसखेड ९५, मुळशी ९३, डिंभे ८६, चासकमान ९८, पवना ८९, टेमघर ७३, वरसगाव ८२, गुंजवणी ९६, नीरा देवधर ८९. भाटघर ८४, वीर ९५ टक्के भरले आहे. तर नाझरे, माणिकडोह, घोड, विसापूर ही धरणेही दहा ते पंधरा दिवसांत भरतील. धरणातील पाणीपातळीत अजूनही वाढ होत असल्याने धरणातून सांडवा, डावा कालवा आणि उजव्या कालव्याला पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. 

धरणांमधून पाण्याचा विसर्ग शुक्रवारी सकाळी येडगाव धरणातून ५४६०, वडज ३६१, चासकमान ७३२५, वडिवळे ७५३, आंध्रा १४६२, कासारसाई २००, खडकवासला १३,९८१, वीर ३१ हजार ८१३ क्सुसेकने पाण्याचा विसर्ग नदीला सोडण्यात आला आहे. डाव्या कालव्याला येडगाव धरणातून १३००, चासकमान ५५०, वीर ६५० क्सुसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. उजव्या कालव्याला वीर १५५, खडकवासला १००५ क्सुसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तसेच वडज ३२६, खडकवासला २८५, गुंजवणी ३०० क्सुसेकने बंद जलवाहिनीद्वारे पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com