agriculture news in marathi twelve lakh cotton bales arrival in khandesh markets | Agrowon

खानदेशात १२ लाख गाठी बाजारात कापसाची आवक

टीम अॅग्रोवन
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

जळगाव : कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात बऱ्यापैकी गतीने सुरू झाली. दर स्थिर असून, ४८०० ते कमाल ५१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर खेडा खरेदीत शेतकऱ्यांना मिळत आहेत. 

जळगाव : कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात बऱ्यापैकी गतीने सुरू झाली. दर स्थिर असून, ४८०० ते कमाल ५१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर खेडा खरेदीत शेतकऱ्यांना मिळत आहेत. 

खानदेशात पणन महासंघासह भारतीय कापूस महामंडळाची (सीसीआय) कापूस खरेदीदेखील सुरू आहे. शासकीय खरेदी वेगात सुरू असल्याने खेडा खरेदीमध्ये कापसाचे दर मागील २० ते २५ दिवसांपासून स्थिर आहेत. खानदेशात सर्वत्र खेडा खरेदीला वेग देण्यात आला आहे. रावेर, यावल व चोपडा भागांतून दर्जेदार कापूस उपलब्ध होत असल्याने या भागात परराज्यातील खरेदीदार आपले एजंट पाठवून खरेदी करीत आहेत. खेडा खरेदीत एकाच शेतकऱ्याकडे ६० ते ७० क्विंटल कापूस असल्यास त्यांना ५१०० ते ५१५० रुपयांचा दर मिळत आहे. तर १० ते २० क्विंटल कापूस विक्रीसंबंधी खेडा खरेदीमध्ये ४८०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटलचा दर खरेदीदार देत आहेत. 

खानदेशात सुमारे ९३ जिनिंग प्रेसिंग कारखाने सुरू आहेत. या कारखान्यांमध्ये खरेदी सुरू असून, काही कारखानदार कापसाची खेडा खरेदी एजंटच्या माध्यमातून करून घेत आहेत. सुमारे १३ लाख गाठींच्या (एक गाठ १७० किलो) कापसाची आवक खानदेशात सर्वत्र मिळून झाल्याचा अंदाज आहे.  
धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, नंदुरबार भागात गुजरात, मध्य प्रदेशातील जिनिंग प्रेसिंग कारखानदारांचे एजंट कापसाची खरेदी करीत आहेत.

मागील १० ते १५ दिवसांपासून वातावरण बऱ्यापैकी कोरडे व निरभ्र राहिल्याने शेतात कापसाचा दर्जा चांगला आहे. या दर्जेदार कापसालादेखील चांगले दर मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. यामुळे कमाल शेतकऱ्यांनी आपला दर्जेदार कापूस शासकीय केंद्रात विक्री करणे टाळले आहे. कारण, शासकीय केंद्रात सध्या दर ५२०० ते ५४०० रुपये प्रतिक्विंटल दिला जात आहे.

पणन महासंघाची कापूस खरेदी बंदावस्थेत आहे. तर भारतीय कापूस महांडळाची धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा व नंदुरबार तर जळगाव जिल्ह्यांतील चोपडा, जळगाव, एरंडोल, पाचोरा, जामनेरातील शेंदूर्णी, पहूर, बोदवड, भुसावळ येथे कापूस खरेदी सुरू आहे. महामंडळाने मागील आठवड्यापर्यंत सुमारे ८५ हजार क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. 

गुजरात, मध्य प्रदेशातील खरेदीदार दाखल
कापसाखालील क्षेत्र झपाट्याने रिकामे झाल्याने कापसाचा तुटवडा काही जिनिंग कारखान्यांना भासू लागला आहे. यातच गुजरात, मध्य प्रदेशातील खरेदीदार खानदेशातील धुळे जिल्ह्यातील शिरपूर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा, जळगावमधील यावल, चोपडा, जळगाव भागांत कापसाची खरेदी करीत आहेत. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, एरंडोल भागातील जिनींग कारखानदारांकडून कापसाची खरेदी फारशी सुरू नाही. जो साठा आहे, तो रिकामा करून घेण्याकडे जिल्ह्यातील कारखानदारांचा कल आहे.


इतर अॅग्रोमनी
जग महामंदीच्या उंबरठ्यावर उभे :...नवी दिल्ली : जागतिक पातळीवर कोविड-१९ च्या...
कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...मुंबई : ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव आणि संसर्ग...
संरक्षण सिद्धतेप्रमाणेच आरोग्य...सार्वजनिक आरोग्य आणि करोना सारख्या गंभीर साथी...
अनेक वर्षानंतर कापसाची विक्रमी खरेदीभारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) अनेक वर्षानंतर...
शेतीमालाचे फ्युचर्स व्यवहार सुरूकोरोनामुळे ‘एनसीडीइएक्स'ने २० एप्रिल च्या...
विमानसेवा बंदचा भाजीपाला निर्यातीला...पुणे : फेब्रुवारी ते मे या काळात युरोपीय...
वेळेवर करा कर्जाची परतफेडसुरवातीच्या काळात उत्पन्न सुरू होईपर्यंतचा...
मध निर्यातीत मोठी वाढनाशिक: भारतात उत्पादित होणाऱ्या नैसर्गिक मधाला...
शेतकरी उत्पादक कंपन्या ‘डिजिटल’ होणार;...पुणे : राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना डिजिटल...
कुटुंबाच्या अर्थकारणात डाळिंबासह लिंबू...सात एकरांवरील डाळिंब हे मुख्य पीक असले तरी...
देशात साखर उत्पादनात ५७ लाख टनांनी घटकोल्हापूर: देशातील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला...
राज्य अर्थसंकल्पातील महत्वाच्या तरतुदीकृषी   महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती...
'फिक्की'च्या राष्ट्रीय परिषदेत जैन...दिल्ली ः इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री...
ऊस, आले पिकासह जमिनीच्या विश्रांतीचे...कोल्हापूर जिल्ह्यातील शेडशाळ (ता. शिरोळ) येथील...
अन्नधान्याचे यंदा विक्रमी उत्पादन नवी दिल्ली: देशात यंदा खरीप हंगामात...
राज्यातील रेशीम बाजारात १० कोटींची...नागपूर ः राज्यात रेशीमकोष खरेदी बाजारपेठेला...
आर्थिक निर्णयांनी वाढवला प्रियंकाताईंचा...पती गौरव काकडे यांच्या आग्रहावरून पुणे शहरातील...
गेल्या वर्षीच्या साखर निर्यातीसाठी...कोल्हापूर : गेल्या वर्षीची (२०१८-१९) साखर निर्यात...
आंतरराष्ट्रीय डाळ परिषदेकडे उद्योजकांचे...पुणे  : जागतिक कडधान्य उत्पादन व बाजारपेठेला...
कच्च्या साखरेच्या दरात उच्चांकी वाढकोल्हापूर : जागतिक बाजारात कच्च्या साखरेच्या दरात...