Agriculture news in Marathi Twelve quintals 35 kg of soybean harvested per hectare | Agrowon

सोयाबीन हेक्टरी पिकले बारा क्विंटल ३५ किलो

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 डिसेंबर 2021

पीक कापणी प्रयोगाअंती लातूर जिल्ह्यात हेक्टरी १२ क्विंटल ३५ किलो, उस्मानाबाद जिल्ह्यात १० क्विंटल ६० किलो, तर हिंगोली जिल्ह्यात हेक्टरी ९ क्विंटल ८३ किलोच सोयाबीन पिकल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.

लातूर : पीक कापणी प्रयोगाअंती लातूर जिल्ह्यात हेक्टरी १२ क्विंटल ३५ किलो, उस्मानाबाद जिल्ह्यात १० क्विंटल ६० किलो, तर हिंगोली जिल्ह्यात हेक्टरी ९ क्विंटल ८३ किलोच सोयाबीन पिकल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. नांदेड व परभणी जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकता स्पष्ट होणे बाकी आहे. 

यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारा ठरला आहे. त्यामुळे नुकसानीच्या गर्तेत लातूर जिल्ह्यात मूग हेक्‍टरी ६ क्‍विंटल ३३ किलो, तर उडीद हेक्‍टरी ६ क्‍विंटल ९८ किलो पिकल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली.

यंदाच्या खरीप हंगामात लातूर जिल्ह्यापाठोपाठ उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली आदी जिल्ह्यातही मूग, उडदाची उत्पादकता कृषी विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात मूग हेक्‍टरी ७ क्‍विंटल ५० किलो, उडीद हेक्‍टरी ७ क्‍विंटल ८६ किलो पिकला आहे. 

नांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता हेक्‍टरी ५ क्‍विंटल १३ किलो, तर उडदाची उत्पादकता हेक्‍टरी ४ क्‍विंटल ३३ किलो आली आहे. परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता हेक्‍टरी ६ क्‍विंटल ८९ किलो, तर उडदाची उत्पादकता हेक्‍टरी ५ क्‍विंटल ९५ किलो आली आहे. 

हिंगोली जिल्ह्यात मुगाची उत्पादकता हेक्‍टरी ५ क्‍विंटल १२ किलो, तर उडदाची उत्पादकता हेक्‍टरी ५ क्‍विंटल ८ किलो आली आहे. पाचही जिल्ह्यात मूग २ ते २.७५ क्‍विंटल एकरी पिकला. तर उडीद २ ते ३.२४ क्‍विंटल एकरी पिकल्याचे चित्र आहे. सोयाबीन, कपाशी, तूर, मका, बाजरी आदी पिकांची उत्पादकता अजून स्पष्ट होणे बाकी असल्याचेही कृषी सहसंचालक कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.
 


इतर अॅग्रो विशेष
महाराष्ट्रात ३५ धान्य आधारित इथेनॉल...वृत्तसेवा - केंद्र सरकारने (Central Government)...
रशियासाठी निर्यातीच्या द्राक्ष दराचा...पुणे - महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने...
गावरान कि ब्रॉयलर चवीला कोण जबरदस्त?कोंबडीची पचनसंस्था कशी कार्य करते. तुम्ही कोंबडी...
थंडीत खा अंडी रोज सकाळी उठल्यावर कसला नाष्टा करावा जो कि...
गुणवत्तापूर्ण आंब्याला मिळवली ग्राहक...मालगुंड (ता. जि. रत्नागिरी) येथील विद्याधर...
ट्रायकोडर्मा निर्मितीसाठी शेतात उभारली...राहुल रसाळ यांनी शेत परिसरात छोटेखानी प्रयोगशाळा...
टिळा तेजाचामराठी भाषेला मातीतल्या कवितेचे लेणं चढवणाऱ्या कवी...
शेळ्यांसाठी शेंगवर्गीय चारा पिक शेळ्यांचा सर्वांत आवडता आहार म्हणजे झाडाचा पाला....
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...मराठवाडा कापूस बाजारभाव - आज किनवट बाजारात...
जनावरांमध्ये अचानक गर्भपात का होतो?या रोगाचा प्रसार प्रामुख्याने गवत, पिण्याचे पाणी...
सहकाराला मारक कायदे बदलण्याला प्राधान्य राज्यातील सहकारी बॅंकिंग व्यवस्थेचे अभ्यासक...
पंजाबात मोहरीच्या क्षेत्रात वाढ, मात्र...वृत्तसेवा - पंजाबमध्ये मोहरीची लागवड ३३ हजार...
‘जुनं ते सोनं' चा खोटेपणा "जुनी शेती खूप चांगली होती. त्या शेतीत खूप...
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
सोयापेंडीच्या मागणीमुळे सोयाबीनचे दर...पुणे ः बाजारात सध्या सोयाबीन दर एका भावपातळीवर...
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...