agriculture news in marathi twelve thousand crore rupees loan waive benefit to nineteen lakh farmers of Maharashtra | Agrowon

मार्चअखेर बारा हजार कोटींची कर्जमाफी;सुमारे १९ लाख शेतकऱ्यांना लाभ

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 एप्रिल 2020

ठाकरे सरकारने जाहिर केलेल्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मंगळवारअखेर (ता.३१) राज्यातील शेतकऱ्यांना सुमारे बारा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. सुमारे १९ लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत या योजनेचा लाभ मिळाला आहे.

मुंबई : ठाकरे सरकारने जाहिर केलेल्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मंगळवारअखेर (ता.३१) राज्यातील शेतकऱ्यांना सुमारे बारा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. सुमारे १९ लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत या योजनेचा लाभ मिळाला आहे. फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेअंतर्गत हा टप्पा गाठण्यासाठी सुमारे दीड वर्षे लागले होते. त्यातुलनेत अवघ्या एक ते सव्वा महिन्यातच ठाकरे सरकारने हा टप्पा गाठून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
 
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने नुकतीच महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंतच्या कालावधीत अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या, तसेच या कालावधीत अल्पमुदतीच्या पीक कर्जाचे पुनर्गठन, फेरपुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे थकीत दोन लाख रुपये कर्ज माफ केले जाणार आहे. त्याशिवाय राज्य सरकारने अर्थसंकल्पात दोन लाखांवर थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता योजना जाहीर केली आहे.

योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या काळात घेतलेल्या पीक कर्जाच्या व्याज व मुद्दल यांची दोन लाखांवर थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनी दोन लाखांवरील रक्कम भरल्यानंतर शासनाकडून त्यांना दोन लाखांचा लाभ दिला जाणार आहे. तसेच नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. त्याची घोषणाही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

२०१७-१८ ते २०१९-२० या तीन वर्षांत घेतलेल्या पीक कर्जाची पूर्ण रक्कम ३० जून २०२० पर्यंत नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना २०१८-१९ या वर्षात घेतलेल्या पीक कर्जावर ५० हजारांची प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार आहे. मात्र पीक कर्जाची व पूर्णतः परतफेड केलेल्या पीक कर्जाची रक्कम ५० हजारांपेक्षा कमी असल्यास प्रत्यक्ष कर्जाच्या रक्कमेइतका प्रोत्साहन लाभ दिला जाणार आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात २४ फेब्रुवारीला कर्जमाफीची पहिली यादी तर २९ फेब्रुवारीला दुसरी यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतरही शेतकरी कर्जमाफीचे काम गतीने सुरु होते. सध्याच्या कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावामुळे शेतकरी कर्जमाफी योजनेच्या कामाला ब्रेक लागला असला तरी ३१ मार्चपर्यंत या योजनेने मोठा टप्पा गाठला आहे. 

शेतकऱ्यांच्या खात्यात ११ हजार ९६६ कोटी जमा
मंगळवारपर्यंत (ता.३१) राज्यातील १८ लाख ८९ हजार ५२८ शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ११ हजार ९६६ कोटी २१ लाख रुपयांची कर्जमाफीपोटी रक्कम जमा करण्यात आली आहे. यात जिल्हा सहकारी बँकांच्या माध्यमातून १० लाख ४० हजार ९३५ शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार ४०७ कोटी १३ लाख, तर व्यापारी बँकांच्या माध्यमातून ८ लाख ४८ हजार ५९३ शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार ५५९ कोटी ८० हजार रुपये जमा करण्यात आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिली आहे.


इतर अॅग्रो विशेष
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...
पावसाचे धुमशान सुरुच पुणे   ः राज्यातील काही भागांत...
जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...
निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...