नांदेड विभागात तूर विक्रीसाठी १२ हजारांवर शेतकऱ्यांची नोंदणी

नांदेड विभागात तूर विक्रीसाठी १२ हजारांवर शेतकऱ्यांची नोंदणी
नांदेड विभागात तूर विक्रीसाठी १२ हजारांवर शेतकऱ्यांची नोंदणी

नांदेड : किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हमीभावाने (प्रतिक्विंटल ५८०० रुपये) तूर विक्रीसाठी नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २३ खरेदी केंद्रांवर १२ हजार ९७६ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. खुल्या बाजारातील तुरीचे दर हमीभावाच्या तुलनेत प्रतिक्विंटल मागे १००० ते १२०० रुपयांनी कमी आहेत. कमी भावामुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान थांबविण्यासाठी तत्काळ शासकीय तूर खरेदी सुरू करणे आवश्यक झाले आहे. यंदा (२०१९-२०) हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी नाफेड तर्फे राज्य सहकारी पणन महासंघ, विदर्भ सहकारी महासंघ, महाएफपीसी यांना शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचे आदेश देण्यात आहेत. नांदेड जिल्ह्यात जिल्हा विपणन अधिकारी कार्यालयातर्फे शनिवार (ता.१) पर्यत हदगाव येथे ७९८ शेतकऱ्यांनी, किनवट येथे ४७५, मुखेड येथे ३५४, नांदेड येथे ३० शेतकऱ्यांनी अशी एकूण १ हजार ६५७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, असे जिल्हा विपणन अधिकारी सुधीर पाटील यांनी सांगितले. विदर्भ सहकारी महासंघातर्फे भोकर येथे १३५ शेतकऱ्यांनी, धर्माबाद येथे ३६२ शेतकऱ्यांनी, नायगाव येथे २३१ शेतकऱ्यांनी अशी मिळून एकूण नोंदणी ७२८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. परभणी जिल्ह्यात जिल्हा विपणन अधिकारी कार्यालयातर्फे परभणी येथे १ हजार ४३९ शेतकरी, जिंतूर येथे १ हजार ६९५, सेलू येथे ३०६, पाथरी येथे ३६, सोनपेठ येथे ९३, पालम येथे ३६९, पूर्णा येथे ६७३ असे एकूण ७ केंद्रांवर ४ हजार ६११ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. हिंगोली जिल्ह्यात जिल्हा विपणन अधिकारी कार्यालयातर्फे हिंगोली येथे १ हजार ५६८ शेतकऱ्यांनी, कळमनुरी येथे १ हजार १४६, वसमत येथे ६२८, जवळा बाजार येथे १३३, कन्हेरगाव येथे २२ असे एकूण ६ खरेदी केंद्रावर ४ हजार ८५८ शेतकऱ्यांची नोंदणी केली, असे जिल्हा विपणन अधिकारी मिलिंद कापुरे यांनी सांगितले. परभणी जिल्ह्यात विदर्भ सहकारी महासंघातर्फे मानवत येथील केंद्रावर ६७० शेतकऱ्यांची आणि गंगाखेड येथील केंद्रावर ४५२ शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली, असे जिल्हा व्यवस्थापक भागवत सोळंके यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com