जळगावात वीस पुलांसाठी ३४ कोटींच्या कामांना मान्यता

जळगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा २ अंतर्गत जिल्ह्यातील २० पुलांच्या बांधकामासाठी ३४ कोटी रुपयांच्या कामांना नुकतीच प्रशासकीय मान्यता शासनाच्या ग्राम विकास विभागातर्फे देण्यात आली.
For twenty bridges in Jalgaon Approval for works worth Rs. 34 crore
For twenty bridges in Jalgaon Approval for works worth Rs. 34 crore

जळगाव  :  पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा २ अंतर्गत जिल्ह्यातील २० पुलांच्या बांधकामासाठी ३४ कोटी रुपयांच्या कामांना नुकतीच प्रशासकीय मान्यता शासनाच्या ग्राम विकास विभागातर्फे देण्यात आली. हे पूल चार विधानसभा मतदारसंघांमध्ये तयार करण्यात येणार आहेत.

आमदारांनी याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. पाटील यांनी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केल्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहकार्याने या कामांना मंजुरी मिळाली. यात धरणगाव तालुक्यातील धार ते चोरगाव या रस्त्यावर ३ पुलांच्या कामांसाठी ३ कोटी ४१ लक्ष, पथराड - वंजारी खपाट ते बोरखेडा रस्त्यावर १ कोटी ४८ लक्ष, जळगाव तालुक्यातील हायवे ते तरसोद रस्त्यावर १ कोटी २८ लक्ष व बिलखेडा ते बिलवाडी या रस्त्यावर १ कोटी ३५ लक्ष असे एकूण जळगाव ग्रामीणमध्ये ६ पुलांच्या कामासाठी ७ कोटी ४२ लक्षच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली.  

जामनेर तालुक्यातील स्टेय हायवे ४२ ते सावखेडा; एमडीआर २९ ते शेळगाव,चिंचखेडा ते वाकडी; स्टेट हायवे ४६ ते गोद्री रस्त्यावर ६ पुलांच्या कामांसाठी १६ कोटी निधी मिळेल. चोपडा तालुक्यातील मालखेडा शेंदाणी रस्त्यावर ३ पुलांच्या कामांसाठी ३ कोटी ३३ लक्ष रुपयांची तरतूद होईल.

पाचोरा तालुक्यातील लोहटार गाळण चिंचोले नगरदेवळा खाजोळा सारवे बु. रस्त्यावर १ पुलाच्या कामांसाठी २ कोटी २१ लक्ष; यावल तालुक्यातील सातोद - कोळवद - असारबारी रस्त्यावर २ पुलांच्या कामांसाठी ३ कोटी १९ लक्ष , रावेर तालुक्यातील भोर - पुनखेडा - पातोंडी - धुरखेडा रस्त्यावर १ पुलाच्या कामासाठी ४ कोटी १३ लक्ष मिळतील. बोदवड तालुक्यातील शेलवड - वाकी रस्त्यावर एक पुलाच्या कामासाठी १ कोटी ६ लक्ष निधीच्या कामांना मंजुरी देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com