यवतमाळ जिल्ह्यात वीस नागरिकांचे होम कॉरेंटाइन

यवतमाळ जिल्ह्यात वीस नागरिकांचे होम कॉरेंटाइन
यवतमाळ जिल्ह्यात वीस नागरिकांचे होम कॉरेंटाइन

यवतमाळ : येथील स्व. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलेल्या नऊ नागरिकांपैकी दोन नागरिकांचे नमुने पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे गत १४ दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची शोधमोहीम प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आत्तापर्यंत जिल्ह्यात २० नागरिकांना होम कॉरेंटाईन करण्यात आले असून यात विदेशातून आलेल्या चार नागरिकांचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी दिली. या २० लोकांमध्ये आत्तापर्यंत कोणतेही लक्षण आढळून आले नाही. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्यांना कॉरेंटाईन करण्यात आले आहे. आरोग्य पथकाकडून त्यांची नियमितपणे विचारपूस करण्यात येत आहे. याशिवाय दुबईवरून आलेल्या त्या नऊ नागरिकांपैकी दोघांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे नमुने नागपूरला पाठविण्यात आले असून त्यांचा रिर्पार्ट अद्याप प्राप्त व्हायचा आहे. जिल्ह्याचा संपर्क क्रमांक व टोल फ्री क्रमांकावर विदेशातून आलेल्या चार नागरिकांनी स्वत:हून संपर्क साधला. यातील तीन नागरिक थायलंड मधून तर एक अजर बैजान (युरोप खंडातील देश) येथून जिल्ह्यात दाखल झाला होता. तालुकास्तरीय आरोग्य पथकाकडून त्यांनासुध्दा होम कॉरेंटाईन करण्यात आले आहे. अद्याप या नागरिकांमध्ये कोणतेही लक्षणे नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील नागरिकांनी कोणतीही भीती मनात न बाळगता काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. त्वरित संपर्क साधावा... कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता तसेच जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या तातडीच्या मागणीवरून अद्ययावत साधनसामग्री, औषधोपचार, मास्क आदी बाबींसाठी जिल्हा नियोजन समितीमधून पालकमंत्र्यांच्या सूचनेवरून तातडीने ५० लक्ष रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. तसेच जे विदेशातून आलेले नागरिक आहेत, त्यांनी स्वत: समोर येऊन टोल क्री क्रमांक १०४ तसेच ०७२३२-२४५७०५, २३९५१५ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com