शिराळ्यातील महापूरग्रस्तांसाठी २० कोटी खात्यात जमा

शिराळ्यातील महापूरग्रस्तांसाठी २० कोटी खात्यात जमा
शिराळ्यातील महापूरग्रस्तांसाठी २० कोटी खात्यात जमा

सांगली : शिराळा तालुक्यात जुलै व ऑगस्टमध्ये अतिवृष्टी व महापुराने झालेल्या नुकसानाची शेतकरी व नागरिकांना २० कोटी रुपयांची मदत संबंधित खातेदारांच्या खात्यावर जमा झाली असून, त्यापैकी १९ कोटी ९ लाख रुपये बाधित शेतीसाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली असल्याची माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली. शिराळा तालुक्यातील ९५ गावे अतिवृष्टी व महापुरामुळे बाधित झाली होती. त्यानुसार शासनाने याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. कृषी विभाग, महसूल विभाग यांनी बाधित झालेल्या शेतीसह घरांचे पंचनामे केले. पंचनाम्याचा अहवाल जिल्हा पातळीवर सादर केला होता. जिल्हा स्तरावरून तो अहवाल संबंधित विभागाकडे पाठविण्यात आला होता. अंशतः व पूर्ण पडझड झालेल्या घरांसाठी ८० लाख ५ हजार रुपये, मृत जनावरांसाठी ५ लाख ५० हजार रुपये, पुरामुळे बाधित ६१३ कुटुंबांना ६१ लाख ३० हजार रुपये, त्याचबरोबर १२२ क्विंटल धान्य नागरिकांना देण्यात आले आहे.तालुक्यातील ९५ गावांतील २४ हजार ८४६ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये २८०६ हेक्टर ऊस, ५८४७ हेक्टर कोरडवाहू क्षेत्र, ०.६५ हेक्टर फळबाग क्षेत्र असे एकूण ८६५४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. त्यातील ३ हजार २४१ शेतकरी कर्जदार तर २१ हजार ६०७ शेतकरी बिगर कर्जदार आहेत. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना शेती नुकसानीचे अनुदान खात्यावर जमा करण्यात आले आहे. तालुक्यातील कोरडवाहू शेतीच्या नुकसानापोटी ९ कोटी ६४ लाख ६७ ८६८ रुपये, ऊस पिकासाठी ७ कोटी १३ लाख ८८ हजार ९४७ रुपये तर फळबागांसाठी ३५ हजार १०० रुपये असे ६९४१ हेक्टरसाठी १७ कोटी ८ लाख ९१ हजार ९१५ रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे.   बाधित शेतीसाठी ः १७ कोटी ८ लाख ९१ हजार  घरांची पडझडीसाठी ः ८० लाख ५५ हजार  मृत जनावरांसाठी ५ लाख ५० हजार   ३२४१ कर्जदार शेतकरी अजूनही नुकसानभरपाईपासून वंचित

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com