पुणे जिल्हा बॅंकेच्या शून्य टक्के व्याजाच्या लाभासाठी वीसच दिवस शिल्लक

पुणे : पुणे जिल्हा बॅंकेच्या वतीने (पीडीसीसी) चालू वर्षीच्या खरीप आणि रब्बी हंगामात मिळून २८ फेब्रुवारी २०२२ अखेरपर्यंत पाच लाख रुपयांपर्यंतचे २ हजार १७१ कोटी ६६ लाख ५२ हजार रुपयांचे पीक कर्ज २ लाख ९१ हजार ४३७ शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले.
Twenty days left for Pune District Bank's zero percent interest benefit
Twenty days left for Pune District Bank's zero percent interest benefit

पुणे : पुणे जिल्हा बॅंकेच्या वतीने (पीडीसीसी) चालू वर्षीच्या खरीप आणि रब्बी हंगामात मिळून २८ फेब्रुवारी २०२२ अखेरपर्यंत पाच लाख रुपयांपर्यंतचे २ हजार १७१ कोटी ६६ लाख ५२ हजार रुपयांचे पीक कर्ज २ लाख ९१ हजार ४३७ शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. या शेतकऱ्यांनी कर्जाची मुदतीत परतफेड केल्यास त्यांना शून्य टक्के व्याजाचा लाभ मिळू शकेल. मात्र त्यासाठी आधी व्याजासह सर्व कर्जाची परतफेड करावी लागेल. त्यासाठी अखेरचे केवळ २० उरले आहेत, अशी माहिती बॅंकेच्या सूत्रांनी दिली.

केंद्र सरकारने आता व्याज सवलतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आधी त्यांच्याकडील संपूर्ण कर्ज रकमेची (व्याजासह) परतफेड करणे आवश्‍यक आहे. 

सद्यःस्थितीत एक लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जासाठी दर साल दर शेकडा ६ टक्के व्याजदराने पीक कर्ज वाटप केले जाते. परंतु यापैकी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी तीन टक्के व्याजाचा परतावा शेतकऱ्यांना मिळत असतो. त्यामुळे या कर्जाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाखपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजाने मिळते. 

दरम्यान, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आता तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजाने देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदापासून पुणे जिल्हा बॅंकेचा दोन टक्के व्याजदराचा परतावा वाचणार आहे. 

३१ मार्चपर्यंत परतफेडीची मुदत 

खरीप हंगामातील पिकांसाठी पाच लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाचा लाभ मिळण्यासाठी त्यांच्याकडील पीक कर्जाची येत्या ३१ मार्चपर्यंत परतफेड करणे आवश्यक आहे. या मुदतीत पीक कर्जाची परतफेड केली, तरच संबंधित शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराचा फायदा मिळू शकेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com