अमरावती जिल्ह्यात जानेवारी महिन्यात २० शेतकरी आत्महत्या

अमरावती जिल्ह्यात जानेवारी महिन्यात २० शेतकरी आत्महत्या
अमरावती जिल्ह्यात जानेवारी महिन्यात २० शेतकरी आत्महत्या

अमरावती : जिल्ह्यात जानेवारी महिन्यात तब्बल २० शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. दुष्काळ, नापिकी व कर्जबाजारीपणा यातून निर्माण झालेल्या विवंचनेतून शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचे वास्तव आहे.  शेतकरी आत्महत्या नियंत्रणासाठी शासनाकडून गेल्यावेळी दीड लाख तर या वेळी दोन लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. त्यासोबतच इतरही अनेक उपक्रम राबविण्यात येतात. परंतु, या साऱ्या उपाययोजना कागदोपत्री असल्याचे वाढत्या शेतकरी आत्महत्यांवरून सिद्ध झाले आहे. दुष्काळ, नापिकी यांमुळे शेतकरी जेरीस आल्याने शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्‍य भारी पडत आहे. मुलामुलींचे लग्न, दैनंदिन गरजांसाठी लागणाऱ्या पैशाची सोय करणेही शेतीतील उत्पन्नातून शक्‍य होत नाही. त्यातून विवंचना वाढीस लागत शेतकरी मृत्यूला जवळ करतात.  जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १ जानेवारी २००१ पासून आजवर ३८४८ शेतकरी आत्महत्यांची नोंद जिल्ह्यात झाली आहे. यातील १७१० प्रकरणे शासन मदतीसाठी पात्र ठरली तर २०५८ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. जानेवारी महिन्यातील सर्व २० शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. चौकशीअंती यातील मदतीसाठी पात्र, अपात्र आत्महत्या ठरविण्यात येणार आहेत.  गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सर्वाधिक आत्महत्या जिल्ह्यात १९ वर्षातील ३८४८ शेतकरी आत्महत्यांपैकी सर्वाधीक ३७२ आत्महत्यांची गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात नोंद झाली. जानेवारीत ३०६, फेब्रुवारी ३०९, मार्च ३२८, एप्रिल २६५, मे ३२५, जून २९२, जुलै ३०७, सप्टेंबर ३७२, ऑक्‍टोबर ३६२, नोव्हेंबर ३३४ व डिसेंबर ३२५ याप्रमाणे आत्महत्यांची नोंद आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com