धान बारदानाचे २५ कोटी थकीत

शेतकऱ्यांकडून घेतलेल्या बारदाण्याची तब्बल २५ कोटी रुपयांची रक्कम देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ होत आहे. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.
धान बारदानाचे २५ कोटी थकीत
धान बारदानाचे २५ कोटी थकीत

गडचिरोली :  शेतकऱ्यांकडून घेतलेल्या बारदाण्याची तब्बल २५ कोटी रुपयांची रक्कम देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ होत आहे. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. देसाईगंज तालुक्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे दोन धान खरेदी केंद्र आहेत. वडसा येथील केंद्रावर गेल्या हंगामात ४१ हजार क्विंटल धान्याची खरेदी करण्यात आली. कोरेगाव येथील दुसऱ्या केंद्रावर ४० हजार २४५5 क्विंटल धान खरेदी झाली. धान खरेदी दरम्यान रिकामे बारदान्याचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला, परिणामी शेतकऱ्यांनी स्वतःकडील बारदाना देऊन धानाची विक्री केली. या बारदाण्याचे पैसे संबंधित शेतकऱ्यांना अजूनही मिळाले नाही. त्यामुळे २० ते २२ रुपये प्रति नग अशा दराचा रिकामा बारदाना यावेळी धान विक्रीसाठी कुठून आणायचा? त्या करिता पैशाची सोय कशी करावी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. धान बारदाण्याचे जवळपास २५ कोटी रुपये थकीत आहेत, त्यांची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com