सांगलीत वीस लाखांचा खतसाठा जप्त

विना परवाना खत विक्री प्रकल्पावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून २० लाख ६० हजार रुपये किमतीचा खतांचा साठा जप्त केल्याप्रकरणी संबंधित व्यापाऱ्यांवर संजय नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 सांगलीत वीस लाखांचा खतसाठा जप्त
सांगलीत वीस लाखांचा खतसाठा जप्त

सांगली : विना परवाना खत विक्री प्रकल्पावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून २० लाख ६० हजार रुपये किमतीचा खतांचा साठा जप्त केल्याप्रकरणी संबंधित व्यापाऱ्यांवर संजय नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईमुळे विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बनावट खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यात ११ भरारी पथके नियुक्त केली आहेत. भरारी पथकांना शहरातील ग्लोबल इम्पोर्टस् येथे विना परवाना खतांची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक सुरेंद्र पाटील, मोहीम अधिकारी धनाजी पाटील यांच्यासह पथकाने छापा टाकला. ग्लोबल इम्पोर्टस्मध्ये मॅग्नेशियम सल्फेट, फेरस सल्फेट, सल्फर, बोरॉन, झिंक सल्फेट, कॅल्शिअम नायट्रेट, अशी खते आढळून आली. पथकाने तौसिफ मार्फानी यांच्याकडे खतांच्या पावत्यांची मागणी केली. परंतु त्यांच्याकडे पावत्या आढळून आल्या नाहीत. तसेच ते कृषी विभागाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता खतांची विक्री करीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे पथकाने कॅल्शियम नायट्रेट २  टन, सल्फर २ टन, सल्फर ९०० किलो, झिंक सल्फेट ४०० किलो, फेरस सल्फेट २ टन, मॅग्नेशियम सल्फेट ५० किलो, बोरॉन २ टन, सिलिकॉन गोळी ५ टन, सिलिकॉन पावडर १० टन, हुमिक फ्लेक्स ३०  टन, बेन्टोनेट गोळी ३० टन, अशी ४ लाख १० हजार ६०० रुपये किमतीची ८४ टन ३५० किलो खते जप्त केली. तसेच १६ लाख ५० हजार रुपये किमतीचे अन्य साहित्य जप्त केले.  या खतांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत, असे  जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक पाटील यांनी सांगितले.  सदर प्रकरणी जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक सुरेंद्र पाटील यांनी या संबंधी तक्रार दिली, सदर भरारी पथकामध्ये जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक  सुरेंद्र पाटील मोहीम अधिकारी  धनाजी पाटील यांच्यासह इतर कर्मचारी यांनी कारवाई केली सदर कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्या बाबतचा गुन्हा संजय नगर पोलिस ठाणे येथे दाखल करण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com