Agriculture news in marathi Twenty lakh manure stock seized in Sangli | Agrowon

सांगलीत वीस लाखांचा खतसाठा जप्त

टीम अॅग्रोवन
सोमवार, 14 जून 2021

विना परवाना खत विक्री प्रकल्पावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून २० लाख ६० हजार रुपये किमतीचा खतांचा साठा जप्त केल्याप्रकरणी संबंधित व्यापाऱ्यांवर संजय नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सांगली : विना परवाना खत विक्री प्रकल्पावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून २० लाख ६० हजार रुपये किमतीचा खतांचा साठा जप्त केल्याप्रकरणी संबंधित व्यापाऱ्यांवर संजय नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईमुळे विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बनावट खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यात ११ भरारी पथके नियुक्त केली आहेत. भरारी पथकांना शहरातील ग्लोबल इम्पोर्टस् येथे विना परवाना खतांची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक सुरेंद्र पाटील, मोहीम अधिकारी धनाजी पाटील यांच्यासह पथकाने छापा टाकला.

ग्लोबल इम्पोर्टस्मध्ये मॅग्नेशियम सल्फेट, फेरस सल्फेट, सल्फर, बोरॉन, झिंक सल्फेट, कॅल्शिअम नायट्रेट, अशी खते आढळून आली. पथकाने तौसिफ मार्फानी यांच्याकडे खतांच्या पावत्यांची मागणी केली. परंतु त्यांच्याकडे पावत्या आढळून आल्या नाहीत. तसेच ते कृषी विभागाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता खतांची विक्री करीत असल्याचे आढळून आले.

त्यामुळे पथकाने कॅल्शियम नायट्रेट २  टन, सल्फर २ टन, सल्फर ९०० किलो, झिंक सल्फेट ४०० किलो, फेरस सल्फेट २ टन, मॅग्नेशियम सल्फेट ५० किलो, बोरॉन २ टन, सिलिकॉन गोळी ५ टन, सिलिकॉन पावडर १० टन, हुमिक फ्लेक्स ३०  टन, बेन्टोनेट गोळी ३० टन, अशी ४ लाख १० हजार ६०० रुपये किमतीची ८४ टन ३५० किलो खते जप्त केली. तसेच १६ लाख ५० हजार रुपये किमतीचे अन्य साहित्य जप्त केले.  या खतांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत, असे  जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक पाटील यांनी सांगितले. 

सदर प्रकरणी जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक सुरेंद्र पाटील यांनी या संबंधी तक्रार दिली, सदर भरारी पथकामध्ये जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक 
सुरेंद्र पाटील मोहीम अधिकारी  धनाजी पाटील यांच्यासह इतर कर्मचारी यांनी कारवाई केली सदर कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्या बाबतचा गुन्हा संजय नगर पोलिस ठाणे येथे दाखल करण्यात आला आहे.


इतर ताज्या घडामोडी
सेंद्रिय शेतीचे तंत्र अंगीकारा ः डॉ. ढवणबदनापूर, जि. जालना : अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित...
पंतप्रधान आवास योजनेसाठी ११ लाख नावे...नगर ः ग्रामीण भागातील गरीब, अल्पभूधारक, घर...
अमरावती : निकृष्ट बियाणेप्रकरणी भरपाईचे...अमरावती ः निकृष्ट बियाण्यासंदर्भाने तालुकास्तरीय...
सात-बारासह फेरफारही मिळणार आता ऑनलाइन...पुणे : शेती संबंधीच्या दस्ताऐवजांची संगणकीकृत...
सांगली : पूरबाधितांच्या पंचनाम्यांचा...सांगली : महापुरानंतर आता नुकसानीचे पंचनामे सुरू...
अतिवृष्टीने नुकसान; ३४ हजारांवर अर्जअकोला : गेल्या महिन्यात जिल्ह्यात तीन दिवस...
जमीन अधिग्रहणाला विरोध; आळेफाट्यावर...आळेफाटा, जि. पुणे : पुणे-नाशिक हायस्पीड...
नगरमध्ये मिळाला पीकविमा; श्रेयासाठी...नगर : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर गेल्या...
पदविकाधारकांना खासगी पशुवैद्यकीय...अकोला : दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन...
राळेगावमध्ये कपाशीवर बोंडअळीचा...राळेगाव, जि. यवतमाळ : जिल्ह्याचे मुख्य पीक...
परभणीत ४४६ कोटी ५९ लाख रुपये वितरणपरभणी ः चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२) जुलै...
अनेक नोंदणीधारक शेतकरी ज्वारी...भालेर, जि. नंदुरबार ः जिल्ह्यात शुक्रवार (ता. ३०...
डाळ व्यापाऱ्याची चार कोटींनी फसवणूक नागपूर : डाळ व्यापाऱ्याला आमिष दाखवून साखरेच्या...
महसूली प्रकरणांचा निपटारा तीन टप्प्यांत...नाशिक : सेवाहक्कांतर्गत १००पेक्षा अधिक व राज्यात...
उजनीतून खरिपासाठी पहिले आवर्तन सोडणारसोलापूर ः उजनी धरणात आतापर्यंत उपयुक्त पाणीसाठा...
नागपुरात सोयाबीन दरातील घोडदौड कायम नागपूर ः प्रक्रिया उद्योजकांची मागणी वाढल्याने...
कृषी सल्ला : दापोली विभागपावसाच्या पाण्यामुळे फवारणी केलेले कीटकनाशक किंवा...
नगरला वाटाणा, भेंडीच्या दरात सुधारणा;...नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
नाशिकमध्ये डाळिंबाच्या आवकेत वाढनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पावसाच्या उघडिपीमुळे भाजीपाला आवकेत वाढपुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...