agriculture news in marathi, twenty lakh ton fertilizers available from old subsidy scheme | Agrowon

जुन्या अनुदान रचनेतील २० लाख टन खते उपलब्ध; दरवाढीचे अद्याप प्रस्ताव नाहीत

टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 एप्रिल 2020

पुणे : रासायनिक खतांच्या मुख्य घटकांच्या अनुदानात कपात करताना इतर २२ श्रेणींच्या अनुदान रचनेत देखील बदल झालेला आहे. मात्र, राज्यात आधीच्या साठ्यातील २० लाख टन खते उपलब्ध आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पुणे : रासायनिक खतांच्या मुख्य घटकांच्या अनुदानात कपात करताना इतर २२ श्रेणींच्या अनुदान रचनेत देखील बदल झालेला आहे. मात्र, राज्यात आधीच्या साठ्यातील २० लाख टन खते उपलब्ध आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

‘डीएपी’चे अनुदान प्रतिटन १७१ रुपये, १२:३२:१६ श्रेणीसाठी २८०, १०:२६:२६ साठी ३५९, २०:२०:०:१३ साठी २४२ रुपये अनुदान कपात झालेली आहे. ‘आरसीएफ’च्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की २२ श्रेणींचे अनुदान कमी करण्यात आले आहे. त्यामुळे बहुतेक कंपन्या आपल्या किमतीचा आढावा घेऊन आपल्या नफा-तोटा पत्रकानुसार शेतकऱ्यांना विक्री करण्याच्या किमती निश्चित करतील. त्यानंतर दरवाढीचे प्रस्ताव दिले जातील. झिंक आणि बोरॉन कोटेड (वेष्टित) श्रेणींना अनुदान देण्याचे धोरण यावर्षी देखील कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे फोर्टिफाईड किंवा कोटेड बोरॉनसाठी प्रतिटन ३०० रुपये तर झिंकसाठी ५०० रुपये अनुदान सुरुच राहणार आहे. 

दरम्यान, राज्यात गेल्या अनुदान रचनेतील अंदाजे २० लाख टन खते उपलब्ध आहेत. युरियाचा ३.९० लाख टन, डीएपीचा २.४४ लाख टन, एमओपीचा १.४६ लाख टन, एसएसपीचा २.७० लाख टन तर संयुक्त खतांचा आठ लाख ५७ हजार टन साठा उपलब्ध आहे. या खतांची विक्री आधीच्या कमाल किरकोळ दराप्रमाणे (एमआरपी) होणार आहे. 

‘‘नवी अनुदान रचना एक एप्रिलपासून लागू झाली असली तरी राज्यात हजारो टन खते विविध कंपन्यांकडून आधीच पोहोचलेली आहेत. काही रेक अजूनही प्रवासात आहेत. नव्या रचनेप्रमाणे काही कंपन्यांना एमआरपीत बदल करायचे झाल्यास आता नव्या ‘डिस्पॅच’वर करता येतील. मात्र, तोटा गृहीत धरूनच काही कंपन्या जुन्या दराचा माल पुरवीत असाव्यात, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, रासायनिक खत कंपन्या नव्या अनुदान रचनेनुसार शेतकऱ्यांना विकायच्या मालाची एमआरपी बदलू शकतात. तो अधिकार कंपन्यांना आहे. तथापि, हा बदल शासनाला कळविण्याचे बंधन कंपन्यांना आहे. अद्याप एकाही कंपनीने दरवाढीचे प्रस्तावित बदल कळविलेले नाहीत. अर्थात, पुढील काही दिवसांत बदलाबाबत पत्रव्यवहार काही कंपन्यांकडून होऊ देखील शकतो. 

किमतीपेक्षा पुरवठ्याकडे सध्या लक्ष
फर्टिलायझर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या अनुदान रचनेप्रमाणे अनेक कंपन्या आपल्या एमआरपीत बदल करण्याची शक्यता आहे. मात्र, ‘कोरोना’ची पार्श्वभूमी तसेच संचारबंदी स्थितीमुळे किमतीचे नियोजन करण्यासाठी संधी मिळालेली नाही. किमतीपेक्षाही राज्यात यंदाच्या हंगामात खते कमी पडणार नाही याकडे सर्व कंपन्यांचे लक्ष आहे. 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...
परभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...
नाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...
`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...
ऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा...पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध...
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावीमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च...
‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर...नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस...
शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या...कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही...
मोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसानबुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपूर जिल्ह्यात पुराचा २९ हजार...नागपूर : पुरामुळे जिल्ह्यात २९ हजार २६२...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
डाळिंब फळपिकातील तेलकट डाग व्यवस्थापनसोलापूर, सांगली, नाशिक आणि नगर यासारख्या...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...