agriculture news in marathi, twenty percent grapes area affected by dieses, sangli, maharashtra | Agrowon

सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर डाऊनी 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

बदलत्या हवामानाचा फटका द्राक्ष बागेला बसला आहे. हवामान कसे राहिल सांगता येत नाही. पण असेच हवामान राहिले तर द्राक्ष बागांवर डाऊनीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- महादेव लाड, कुंडल.

सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस, त्यानंतर धुके, दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतातूर झाला आहे. या बदलत्या वातावरणामुळे २० टक्के द्राक्ष क्षेत्रावरील बागांवर डाऊनीचा प्रादुर्भाव झाला असल्याचे शेतकऱ्यांनी सागितले आहे. असेच वातावरण राहिल्यास डाऊनीचा प्रादुर्भाव वाढून द्राक्ष बागेचे मोठे नुकसान होण्याचा अंदाज शेतकऱ्यांतून व्यक्त होऊ लागला आहे.

जिल्ह्यात आजअखेर ५० टक्के फळ छाटणी झाली आहे. वास्तविक पाहता, ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाल्याने द्राक्षाची छाटणी लवकर घ्यावी लागली. त्यामुळे शेतकऱ्यांनी खर्च करून बागा निरोगी ठेवण्यात यश आले होते. अनेक भागात द्राक्ष बागेत फुलोरा अवस्था आली आहे. तर काही ठिकाणी द्राक्षाचे घड बाहेर पडले आहेत. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात परतीचा पाऊस झाला. शेतात पाणी साचून राहिले होते. त्यातच मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून वातावरणात बदल होऊ लागले आहे. धुकेही पडले होते. त्यामुळे पानांवर पाणी साचून राहिले.  परिणामी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. त्यातच दुष्काळी पट्ट्यात अद्यापही छाटणी झाली नाही. ज्या ठिकाणी छाटणी झाली आहे, त्याठिकाणी डाऊनीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. डाऊनी रोगाचे नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांनी फवारणी करण्याचे नियोजन सुरू केले आहे. काही ठिकाणी फवारणीची संख्यादेखील वाढवली आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात सततच्या पावसाने मुगाचे...नगर  ः नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून...
नांदेड जिल्ह्यात साडेसात लाख हेक्टरवर...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील खरिपाच्या पेरणी...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी पट्टा...पुणे  ः चालू वर्षी खरीप हंगामात ड्रम सीडर...
दोंडाईचा मालधक्क्यावर अधिकाऱ्यांच्या...धुळे ः युरिया वितरणातील घोळ, शेतकऱ्यांच्या...
नगर जिल्ह्यात फळबाग लागवड वाढण्याचा...नगर  ः यंदा पाऊस चांगला, शिवाय मागील काही...
कोल्हापुरात अर्धा टक्के शेतकऱ्यांनी ...कोल्हापूर : राज्यात पंतप्रधान पीक विमा योजनेला...
रत्नागिरी जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाची...रत्नागिरी  ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
अकोला जिल्ह्यातील दोन लाखांवर ...अकोला  : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
नागपूर कृषी महाविद्यालय राबवणार ‘ई-...नागपूर  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन...
उभ्या पिकात मूलस्थानी जलसंवर्धनकोरडवाहू शेतीमध्ये जमिनीतील पाण्याची कमतरता पाहता...
दूध प्रश्न बाजूला; शेतकरी संघटनांमधील...कोल्हापूर  : दूध दरप्रश्नी सरकारवर दबाव...
पुण्यात भाजीपाल्याचा पुरवठा संतुलित; दर...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
घरोघरी असावी पोषण परसबागपरसबागेचा आकार हा जागेची उपलब्धता, कुटुंबातील...
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक;...मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या...
अपचन, खोकला, कफावर गुणकारी पिंपळी पावडर आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळींना पिंपळी नक्कीच...
मागण्यांसाठी मराठवाड्यात दूध...औरंगाबाद : दूध उत्पादन खर्चाच्या तुलनेत परवडणारा...
नैसर्गिकरीत्या वाढवा रोगप्रतिकारक शक्तीरोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच शरीरात बाहेरून प्रवेश...
परभणी जिल्ह्यात रास्ता रोको, दूध संकलन...परभणी : दूध दरवाढीसाठी भाजपतर्फे शनिवारी (ता.१)...
दूध दरप्रश्नी आंदोलनाला विदर्भात...नागपूर : दूध दरप्रश्नी भाजपच्या वतीने...
दूध दरप्रश्नी भाजपचे सातारा जिल्ह्यात...सातारा  : गाईच्या दुधाला प्रतिलिटर १० रुपये...