agriculture news in marathi, twenty six crores need for road repairing, nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्हा परिषदेला रस्ते  दुरुस्तीसाठी हवेत २६ कोटी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

नगर  ः नुकत्याच झालेल्या पावसाने जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्तादुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेला २६ कोटींच्या निधीची आवश्‍यकता लागणार आहे. 

नगर  ः नुकत्याच झालेल्या पावसाने जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्तादुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेला २६ कोटींच्या निधीची आवश्‍यकता लागणार आहे. 

जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत १४ हजार १८५ किलोमीटर रस्ता आहे. यामध्ये उत्तर विभागात ६८६०, तर दक्षिण विभागात ७३२५ किलोमीटर रस्त्याचा समावेश आहे. यामध्ये इतर जिल्हा व ग्रामीण मार्गांचा समावेश आहे. ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या पावसाने जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने ग्रामीण व इतर जिल्हा मार्गांची पाहणी करण्याच्या सूचना शाखा अभियंत्यांना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील रस्त्यांची पाहणी सुरू असून, अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे.

ऑक्‍टोबरमधील पावसाचा सर्वाधिक फटका जिल्ह्याच्या उत्तर भागाला बसला आहे. तेथे रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला २६ कोटी रुपयांची आवश्‍यकता भासणार आहे. यात उत्तर विभागामध्ये १९ कोटींची, तर दक्षिण विभागाला सात कोटींची गरज भासणार आहे. हा प्राथमिक अंदाज असून, यामध्ये वाढ होण्याची शक्‍यता असल्याचे दक्षिण व उत्तर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सांगण्यात आले. 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...
वऱ्हाडात विधेयकांविरोधात ‘स्वाभिमानी’...अकोला : केंद्र शासनाने संसदेत नुकतीच...
`अमरावती जिल्ह्यात पीक नुकसानीचे...अमरावती :  जिल्ह्यात संततधार पावसामुळे...
जालना, औरंगाबादमधील दोन मंडळात अतिवृष्टीऔरंगाबाद : काही दिवसांपासून मराठवाड्याच्या...
नगरला निदर्शने, अकोलेत विधेयकांची होळीनगर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी...
ऊसतोड मजुरांचा विमा सरकारने उतरवावा नगर ः राज्यात सध्या कोरोना व्हायरस संसर्ग वाढत...
परभणीत हिरव्या मिरचीला २५०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
दूध, अंडी ः मानवी आहारासाठी उपयुक्तआपल्या शरीराला लागणारी ऊर्जा आहारातून मिळते...
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...