Agriculture news in Marathi Twenty thousand cusecs discharged from the Mula dam | Agrowon

मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्ग

टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पाऊस सुरुच आहे. त्यामुळे मुळा धरणात पाण्याची मोठी आवक होत असल्याने गुरुवारी (ता. १७) रात्रीपासून २० हजार क्युसेकने मुळा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

नगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पाऊस सुरुच आहे. त्यामुळे मुळा धरणात पाण्याची मोठी आवक होत असल्याने गुरुवारी (ता. १७) रात्रीपासून २० हजार क्युसेकने मुळा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. प्रशासनाकडे असलेल्या नोंदणीनुसार शुक्रवारी (ता. १८) सकाळपर्यंत ४५ महसूल मंडळांत चांगल्या पावसाची तर पाच महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली.

नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. जिल्ह्यामधील सीना धरणात सर्वांत आधी भरले. त्यानंतर  भंडारदरा, निळवंडे, मुळा, आढळा, भोजापूर, मांडओहळ, खैरी, विसापुर धरणेही भरली आहेत. आता सुरू असलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे. अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात पाऊस कमी झाला असला तरी अधून-मधून पाऊस पडतच आहे. याशिवाय जिल्हाभरात पडत असलेल्या पावसामुळे मुळा, सिना धरणात पाण्याची आवक होत आहे.

गुरुवारी सकाळपर्यंत मुळा धरण परिसरात ५८ मिलिमीटर पाऊस झाला. मुळा धरणात त्यामुळे गुरुवारपासून मुळातून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. दुपारनंतर सात हजार क्युसेकने सुरू असलेला मुळातील विसर्ग रात्री उशिरा वीस हजार क्युसेक केला. त्यामुळे मुळा नदीला पूर आला असून नदीकाठच्या  गावांना सतर्कतेचा प्रशासनाने इशारा दिला आहे. शुक्रवारी ही वीस हजारच क्युसेक विसर्ग सुरू होता. सीना धरणाच्या सांडव्यावरुनही एक हजार क्युसेकने नदीत पाणी वाहत होते. शुक्रवारी सकाळपर्यंत ४५ महसूल मंडळांत जोरदार तर ५ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. दिवसभर ढगाळ वातावरण होते.

शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची नोंद अशी - पुणतांबा ः २५, भालेश्वर ः ३०, बेलापुर ः ४६, कोपरगाव ः २७, साकुर ः ५४, आश्वी ः ३०, ब्राह्मणी ः ५४, टाकळीमिया ः ४०, देवळाली ः ४८, राहुरी ः ७१, वडाळा ः ६२, सोनई ः ४४, घोडेगाव ः ६५, सलाबतपुर ः ६१, नेवासा बुद्रुक  ः  ४४, नेवासा खुर्द ः ७७, मिरी ः ५१, करंजी ः ४०, एरंडगाव ः १२९, चापडगाव ः ७६, भातकुडगाव ः ४८, शेवगाव ः ६४.


इतर ताज्या घडामोडी
सांगली जिल्ह्यातील भाजीपाला पिके...सांगली ः सांगली जिल्ह्याची ओळख भाजीपाला...
सणासुदीत निष्काळजीपणा नको ः पंतप्रधान...नवी दिल्ली ः देशातील लॉकडाउन संपला तरी कोरोनाचा...
कांदा बियाण्यांचा काळाबाजार सुरूचनाशिक : मागील वर्षी उन्हाळ कांदा बीजोत्पादनावेळी...
लाचखोर तलाठ्यास कारावासवर्धा : सातबारावरील चूक दुरुस्तीसाठी पंधरा...
‘गोकूळ’ देणार दूध संस्‍थांना दरफरकापोटी...कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध...
केंद्राने महाराष्ट्राच्या हक्काचे ३०...मुंबई : कोरोना संकटामुळे महाराष्ट्रासमोर आर्थिक...
बिहारला मदत, मग महाराष्ट्राला का नाही?...मंगळवेढा, जि. सोलापूर : केंद्र शासनाने बिहारमध्ये...
शेतकऱ्यांशी सरकारला देणेघेणे नाही ः...करमाळा, जि. सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे...
पिकांचे पंचनामे करून प्रस्ताव तातडीने...सोलापूर : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनाला...
सोलापूर जिल्ह्यातील तब्बल ७५ महसूल...सोलापूर :  जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा...
सांगली जिल्ह्यात कृष्णाकाठावरील कृषिपंप...सांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टी झाली...
रत्नागिरीत भातशेतीवर अस्मानी संकटरत्नागिरी : ‘‘ऑक्टोबर महिन्यातील मुसळधार...
नाशिक जिल्ह्यात मका विक्रीत...येवला, जि. नाशिक : सध्या बाजार समित्यांसह खासगी...
नुकसानपातळी अधिक, केंद्रानेही मदत करावी...नाशिक : ‘‘परतीच्या पावसामुळे कापणी योग्य झालेली...
रिसोड तालुक्यात सोयाबीनची हेक्टरी अडीच...रिसोड, जि. वाशीम ः  सततच्या पावसाने सोयाबीन...
सातारा जिल्ह्याला पावसाने झोडपलेसातारा ः दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर सोमवारी...
नुकसानग्रस्तांना अधिकाधिक लाभ द्या :...भंडारा : ‘‘अतिवृष्टी व अवेळी आलेल्या...
नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांची डाळिंब...नगर : दुष्काळ आणि यंदा अतीवृष्टी, तेल्या आणि...
पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : जिल्ह्यात पावसाच्या कमी अधिक स्वरूपात पाऊस...
मराठवाड्यात पीकविमा, नुकसानभरपाई मान्य...नांदेड : ‘‘जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात...