नांदेड जिल्ह्यातील वीस हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित

नांदेड : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील वीस हजार ९०० पात्र शेतकरी अद्याप कर्जमाफीपासून वंचित आहेत. यात पंधरा हजार ९८ खातेदार शेतकऱ्यांच्या निधीअभावी याद्या प्रसिद्ध झालेल्या नाहीत.
Twenty thousand farmers in Nanded district deprived of loan waiver
Twenty thousand farmers in Nanded district deprived of loan waiver

नांदेड : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील वीस हजार ९०० पात्र शेतकरी अद्याप कर्जमाफीपासून वंचित आहेत. यात पंधरा हजार ९८ खातेदार शेतकऱ्यांच्या निधीअभावी याद्या प्रसिद्ध झालेल्या नाहीत. तर पाच हजार ८०२ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण रखडल्याने शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. शासनाने निधी देण्याची मागणी होत आहे.

राज्यात आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर २०१९ मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. यात नांदेड जिल्ह्यातील दोन लाख १४ हजार ४९१ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले. यासाठी १४६१ कोटी ३६ लाख रुपये निधी अपेक्षीत होता. यापैकी दोन लाख १२ हजार ७५९ शेतकऱ्यांची कर्जखाती आधार लिंक केली आहेत. तर पोर्टलवर दोन लाख नऊ हजार ९९ कर्जखाती अपलोड केली आहेत. 

दरम्यान पोर्टलवर एक लाख ९४ हजार एक कर्जखात्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. यापैकी एक लाख ८८ हजार १९६ खातेदारांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. तर अद्याप पाच हजार ८०२ खात्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी आहे. या सोबतच कर्जमाफीस पात्र ठरलेल्या १५ हजार ९८ शेतकऱ्यांची खाती निधीअभावी रखडली आहेत. यामुळे या शेतकऱ्यांच्या याद्या अद्याप प्रसिद्ध झाल्या नाहीत.

जिल्ह्यात आजपर्यंत एक लाख ८३ हजार ३४६ शेतकरी खात्यांवर कर्जमाफीचे १२५२ कोटी ९ लाख रुपये जमा केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडून मिळाली.

कर्जमाफीस पात्र ठरूनही कर्जखात्यावर अद्याप रक्कम जमा झाली नाही. यामुळे कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाली नाही. बॅंकेकडून मात्र पैसे भरण्याचा तगादा सुरु आहे. - अवधूत कदम, शेतकरी, पांगरी, ता. अर्धापूर जि. नांदेड.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com