Agriculture news in marathi Twenty thousand farmers in Nanded district deprived of loan waiver | Page 3 ||| Agrowon

नांदेड जिल्ह्यातील वीस हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 ऑक्टोबर 2021

नांदेड : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील वीस हजार ९०० पात्र शेतकरी अद्याप कर्जमाफीपासून वंचित आहेत. यात पंधरा हजार ९८ खातेदार शेतकऱ्यांच्या निधीअभावी याद्या प्रसिद्ध झालेल्या नाहीत.

नांदेड : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील वीस हजार ९०० पात्र शेतकरी अद्याप कर्जमाफीपासून वंचित आहेत. यात पंधरा हजार ९८ खातेदार शेतकऱ्यांच्या निधीअभावी याद्या प्रसिद्ध झालेल्या नाहीत. तर पाच हजार ८०२ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण रखडल्याने शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. शासनाने निधी देण्याची मागणी होत आहे.

राज्यात आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर २०१९ मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. यात नांदेड जिल्ह्यातील दोन
लाख १४ हजार ४९१ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले. यासाठी १४६१ कोटी ३६ लाख रुपये निधी अपेक्षीत होता. यापैकी दोन लाख १२ हजार ७५९ शेतकऱ्यांची कर्जखाती आधार लिंक केली आहेत. तर पोर्टलवर दोन लाख नऊ हजार ९९ कर्जखाती अपलोड केली आहेत. 

दरम्यान पोर्टलवर एक लाख ९४ हजार एक कर्जखात्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. यापैकी एक लाख ८८ हजार १९६ खातेदारांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. तर अद्याप पाच हजार ८०२ खात्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी आहे. या सोबतच कर्जमाफीस पात्र ठरलेल्या १५ हजार ९८ शेतकऱ्यांची खाती निधीअभावी रखडली आहेत. यामुळे या शेतकऱ्यांच्या याद्या अद्याप प्रसिद्ध झाल्या नाहीत.

जिल्ह्यात आजपर्यंत एक लाख ८३ हजार ३४६ शेतकरी खात्यांवर कर्जमाफीचे १२५२ कोटी ९ लाख रुपये जमा केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडून मिळाली.

कर्जमाफीस पात्र ठरूनही कर्जखात्यावर अद्याप रक्कम जमा झाली नाही. यामुळे कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाली नाही. बॅंकेकडून मात्र पैसे भरण्याचा तगादा सुरु आहे.
- अवधूत कदम, शेतकरी, पांगरी, ता. अर्धापूर जि. नांदेड.


इतर बातम्या
माण तालुक्यात द्राक्ष शेतीचे पावसामुळे...कुकुडवाड, जि. सातारा : मागील आठवड्यात सलग आठवडाभर...
हापूस आंब्याचा हंगाम धोक्यातरत्नागिरी ः कोरोनातील बिकट परिस्थितीचा सामना करत...
‘इटियाडोह’च्या पाण्यासाठी बेमुदत...गोंदिया ः रब्बीत २४ किलोमीटरपर्यंत इटियाडोह...
काटेपूर्णा प्रकल्पावरून रब्बीसाठी पाणी...अकोला ः जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पातून या...
नांदेड जिल्ह्यात रब्बी हंगाम धोक्यातनांदेड : जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून सतत...
हर्षवर्धन पाटलांच्या धरणे आंदोलनाची...इंदापूर, जि. पुणे ः भाजप नेते हर्षवर्धन पाटील...
पुणे बाजार समितीत ‘डमी’ अडत्यांचा...पुणे ः बाजार समितीच्या मुळ उद्देशालाच हरताळ...
नगरमध्ये कोथिंबीर, मेथीची आवक वाढलीनगर, ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
शासन व ग्रामपंचायतीच्या समन्वयातून...नाशिक: ग्रामीण भागात विविध योजना व संकल्पनांची...
ई- पीकपाहणीत जळगाव अव्वल ! जळगाव : राज्यातील पहिल्याच ई- पीकपाहणी प्रकल्पाचा...
कव्हेतील डाळिंब बागेची सोलापूर डाळिंब... सोलापूर ः माढा तालुक्यातील कव्हे (ता.माढा)...
 खानदेशात रब्बीची ४० टक्के पेरणी जळगाव ः  खानदेशात रब्बी हंगामातील पिकांची...
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या ...सोलापूर ः राज्य निवडणूक आयोगाने डिसेंबर २०२१ ते...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : राज्याच्या किमान तापमानाचा पारा १५...
धुळीमुळे शेतकऱ्यांचे ‘पांढरे सोने’...गुमगाव, जि. नागपूर : कोतेवाडा, सोंडेपार शिवारातील...
तांदूळ महागणार ; अवकाळी पावसामुळे...नागपूर : नवीन तांदळाच्या हंगामास सुरुवात झाली आहे...
कामे पूर्ण केलेल्या शेतकरी गटांचे ...पुणेः समूह शेती योजनेत भाग घेतलेल्या शेतकरी...
अनुदान वितरणासाठीची नवी प्रणाली सर्वत्र...पुणे ः कृषी योजनांसाठी दिलेल्या निधीचा उपयोग...
 पन्नास एकरांवर शुगरबीट लागवड कोल्हापूर : महापुराने अस्वस्थ झालेल्या शेतकऱ्याला...
कांडली ग्रामपंचायतीची सौरऊर्जेतून...अमरावती ः अचलपूर पंचायत समितीअंतर्गत कांडली...