agriculture news in marathi twenty thousand quintal farmproducts sold in lockdown period : State Agriculture Secretory | Agrowon

वीस हजार क्विंटल शेतीमालाचा दररोज लॉकडाऊनमध्ये पुरवठा : एकनाथ डवले

टीम अॅग्रोवन
रविवार, 19 एप्रिल 2020

आजच्या घडीला दररोज सरासरी वीस हजार क्विंटल शेतीमालाचा पुरवठा होत आहे, ही मोठी बाब आहे, अशी माहिती राज्याचे प्रधान कृषी सचिव एकनाथ डवले यांनी दिली.

मुंबई ः लॉकडाऊनच्या काळात राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या अनुषंगाने कृषी खात्याने मोठी मोहीम हाती घेतली आहे. २७ मार्चपासून विभागाने याची सुरुवात केली. राज्यभरातील सुमारे तीन हजार शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून थेट शेतीमाल पुरवठा सुरु आहे. लहान-मोठ्या शहरांना भाजीपाला आणि फळे पुरवण्याचे काम केले जात आहे. आजच्या घडीला दररोज सरासरी वीस हजार क्विंटल शेतीमालाचा पुरवठा होत आहे, ही मोठी बाब आहे, अशी माहिती राज्याचे प्रधान कृषी सचिव एकनाथ डवले यांनी दिली.

श्री. डवले यासंदर्भात ‘ॲग्रोवन'शी बोलताना म्हणाले, ‘‘विशेषतः मोठ्या शहरांच्या खालोखाल असलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या शहरांमध्येही थेट भाजीपाला पुरवठा मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. याआधीच्या काळात मोठ्या शहरांमध्ये शेतकरी ते ग्राहक योजनेला बऱ्यापैकी यश आले आहे. मात्र, द्वितीय श्रेणीतील शहरांमध्ये या मोहिमेला अपेक्षित यश मिळत नव्हते. लॉकडाऊनच्या काळात ही एक नवी संधी तयार होत असल्याचे दिसून येत आहे. एकंदर या मोहिमेच्या माध्यमातून राज्याच्या ग्रामीण भागातील शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शहरांमधील गृहनिर्माण हौसिंग सोसायट्यांमधील नागरिकांमध्ये शेतीमाल पुरवठ्याची एक नवी साखळी तयार होत आहे. यातूनच भविष्यात शेतकरी ते थेट ग्राहक भाजीपाला पुरवठा संकल्पनेला व्यापक स्वरुप प्राप्त होईल अशी अपेक्षा आहे. किंबहुना येत्या काळात ही साखळी अजून सक्षम होईल.''

खरीप हंगामाच्या तयारीबाबत बोलताना श्री. डवले म्हणाले, ‘‘खरीप हंगाम तोंडावर आला आहे. त्याअनुषंगाने कृषी विभागाने तयारी सुरु केली आहे. जिल्हा प्रशासनाच्या मदतीने खरीपाचे नियोजन सुरु आहे. स्वतः कृषीमंत्री दादा भुसे यांनी सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना यासंदर्भात पत्रं पाठवली आहेत. येत्या ३० एप्रिलपर्यंत सर्व जिल्हा स्तरावर खरीपाच्या बैठकांचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याच्या खरीपाचे नियोजन केले जाईल. त्यानंतर लॉकडाऊनचा अंदाज घेऊन राज्यस्तरीय खरीप आढावा बैठक आयोजित केली जाईल. खरीप हंगामाच्या अनुषंगाने कृषी खात्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रत्यक्ष फिल्डवर काम सुरु झाले आहे. विभागाने बि-बियाणे, खते आदी निविष्ठांचे नियोजन सुरु केले आहे. हंगामासाठी राज्याला आवश्यक निविष्ठांचा साठा उपलब्ध करण्यासाठी बि-बियाणे आणि खत कंपन्यांकडे मागणी नोंदवण्याचे कामही सुरु आहे. येत्या आठवड्यात कृषी आयुक्तालयामार्फत निविष्ठा कंपन्यांकडे राज्याची मागणी नोंदवण्याचे कामही पूर्ण होईल.'' 


इतर अॅग्रो विशेष
ऊस गाळप यंदा वाढणार कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे...
चिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात...नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत साखर...पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या...
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा...
राज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यतापुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
तीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...
मुहूर्ताचा कापूसच कवडीयुक्त अकोला: यंदा दसऱ्याआधीच कापूस वेचणीचा मुहूर्त अनेक...
कृषी उपसंचालकानेच घातली कृषी उपक्रमांना...यवतमाळ: आत्महत्याग्रस्त अशी जागतिक स्तरावर ओळख...
महिला गट बनवितो ३० प्रकारचे मसालेइटकरे (ता.वाळवा,जि.सांगली) येथील उपक्रमशील महिला...
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...
अडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या...सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली...