शॉर्टसर्किटमुळे दोन एकर गहू खाक

शॉर्टसर्किटमुळे दोन एकर गहू खाक
शॉर्टसर्किटमुळे दोन एकर गहू खाक

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड शिवारात रवींद्र भास्कर संधान यांचा गट क्रमांक ८४१, ८४२  मध्ये गव्हाची शेती आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने शेतातील दोन एकर गहू पूर्णपणे जळून खाक झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला.

शेतातून जाणाऱ्या ११००० केव्हीच्या लाइनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागून जवळपास चाळीस पोती काढणीला आलेला गहू आगीत जळून खाक झाला. संधान यांचा एकूण चार एकर गहू काढणीसाठी आला होता. त्यांचे काढणीचे काम सुरू असताना ही घटना घडली. शेजारी असलेल्या भाऊसाहेब संधान यांच्या द्राक्षबागेचेही नुकसान झाले. शेतालगतच्या द्राक्षाच्या बागेतील वेलींना आगीची झळ बसली. ५० द्राक्षवेली जळाल्या आणि बराचसा भाग होरपळून गेला. 

शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर स्प्रेअर मशिनच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आगीवर वेळीच नियंत्रण आणले गेले. शेतकऱ्यांनी कळविल्यानंतर पिंपळगाव बसवंत अग्निशामक दल आग विझविण्यासाठी दाखल झाले. शेजारी इतर शेतांमध्ये गहू, ऊस पिके आहेत. त्यामुळे हा मोठा अनर्थ टळला. 

वीजवितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. मात्र कुठलाही पंचनामा याबाबतीत करण्यात आला नाही. मोठे नुकसान झाल्याने नुकसान भरपाई मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com