हिंगोली ः सोयाबीनची अडीच लाख हेक्टरवर पेरणी प्रस्तावित

हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८ हजार ४०३ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे.
Two and a half lakh hectare soybeans Proposed to sowing in Hingoli
Two and a half lakh hectare soybeans Proposed to sowing in Hingoli

हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८  हजार ४०३ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. त्यात सोयाबीनच्या २ लाख ६३ हजार ६७७ हेक्टर आणि इतर पिकांच्या ९४ हजार ७२६ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. त्यासाठी एकूण ७४ हजार ७९५ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली. विविध ग्रेडच्या ७३ हजार १०५ टन खतसाठा मंजूर झाला, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे देण्यात आली.

खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनची गेल्या तीन वर्षांत सरासरी २ लाख ५० हजार २७१ हेक्टरवर पेरणी झाली. २०१८ ते २०२० या तीन वर्षांत सरासरी ५४ हजार ३५४ क्विंटल बियाण्याची विक्री झाली. प्रतिहेक्टरी ७५ किलो या दराने येत्या हंगामात २ लाख ६३ हजार ६७७ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी गृहित धरल्यास एकूण १ लाख ९७ हजार ७५८ क्विंटल बियाण्याची गरज आहे. ३५ टक्के बियाणे बदल दरानुसार ६९ हजार २१५ क्विंटल बियाण्याची  गरज आहे. 

२०२० मध्ये ग्रामबिजोत्पादन मोहिमेव्दारे आणि शेतकऱ्यांकडील राखीव बियाणे मिळून एकूण १ लाख ८५ हजार ३१० क्विंटल बियाणे उपलब्ध होऊ शकेल. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडे ५ हजार ४०५ क्विंटल आणि खासगी कंपन्यांकडे ६३ हजार ८१० क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली. ज्वारी, मूग, उडीद, तूर, कपाशी, मका तसेच इतर पिकांच्या ५ हजार ५८० क्विंटल बियाण्याची गरज आहे. त्यासाठी सार्वजनिक कंपन्यांकडे ६४० क्विंटल तर खासगी कंपन्यांकडे ४ हजार ९४० क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली. 

कृषी आयुक्तालयाने ७३ हजार १०५ टन खतसाठा मंजूर केला. एप्रिलअखेर ९ हजार १८० टन खतसाठा मंजूर आहे. त्यापैकी १ हजार ३३८ टन खते उपलब्ध झाली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com