अडीच लाख क्विंटल चंद्रपुरात धान खरेदी

चिमूर प्रकल्पांतर्गत २८ आदिवासी सोसायटी मार्फत धान खरेदी करण्यात आली. ३१ मार्चअखेरच्या आकडेवारीनुसार तब्बल २ लाख ५३ हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे.
अडीच लाख क्विंटल चंद्रपुरात धान खरेदी Two and a half lakh quintals Purchase of paddy in Chandrapur
अडीच लाख क्विंटल चंद्रपुरात धान खरेदी Two and a half lakh quintals Purchase of paddy in Chandrapur

चंद्रपूर : शासनाने या वर्षी हमीभावा सोबतच सातशे रुपये बोनस झाला जाहीर केला होता. त्यामुळे या वर्षी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी आदिवासी विकास महामंडळाला धान विक्री केली. चिमूर प्रकल्पांतर्गत २८ आदिवासी सोसायटी मार्फत धान खरेदी करण्यात आली. ३१ मार्चअखेरच्या आकडेवारीनुसार तब्बल २ लाख ५३ हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. 

चिमूर आदिवासी प्रकल्पात नागभिड, चिमूर, सिंदेवाही, भद्रावती, वरोरा या तालुक्यांचा समावेश होतो. असे असले तरी या तालुक्यांपैकी नागभीड, सिंदेवाही, व चिमुर या तालुक्यातच धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात धानाचे पीक शेतकऱ्यांच्या हातात येते. त्यानंतर शेतकरी आपले धान विक्रीसाठी काढतात. शासनाने मागील वर्षीपासून आदिवासी सोसायट्यांना व पणन महासंघाने संस्था संचालित करीत असलेल्या भात गिरण्यांना धान खरेदीचे अधिकार दिले आहेत.

या सोसायट्यांचे हमीभाव १८६८, पाचशे रुपये बोनस व दोनशे रुपये अनुदान असल्याने शेतकऱ्यांनी आपले धान सोसायट्यांमध्ये विकण्यावर भर दिला. त्यामुळे केंद्रांवर आवक वाढल्याने धान साठवणुकीचा प्रश्न संसार संस्थासमोर निर्माण झाला होता. त्यातच पावसाने हजेरी लावल्याने खरेदी केलेले धान ओले होऊ नये यासाठी सोसायट्यांची दमछाक झाली.

अशी झाली खरेदी

  • नागभीड    १,१९,६२९,०९
  • सिंदेवाही     ६७,०३७,५२
  • चिमूर     ५२,३३४,६९
  • वरोरा     ७,३१२,८३
  • भद्रावती    ६,८२९,४२
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com