कोरोना संकटात टाळेबंदीमुळे राज्याची तिजोरी रिकामी झाली असली तरी कृषी व सलग्न क्षेत्रांनी ११.७ टक्
बातम्या
परभणी जिल्ह्यात सव्वा दोन लाख हेक्टर पिके पीकविमा संरक्षनाविना
परभणी ः गतवर्षीच्या तुलनेत यंदा पीकविमा योजनेतील शेतकरी सहभाग कमी झाला. यंदा एकूण २ लाख २३ हजार १२२ हेक्टरवरील पिके विमा संरक्षणाविना आहेत.
परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदा (२०२०-२१) जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ५५ हजार ४७७ पीकविमा प्रस्ताव सादर केले. एकूण ३६ हजार ८६८ हेक्टरवरील पिकांसाठी विमा संरक्षण घेतले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पीकविमा योजनेतील शेतकरी सहभाग कमी झाला. यंदा एकूण २ लाख २३ हजार १२२ हेक्टरवरील पिके विमा संरक्षणाविना आहेत.
यंदा रब्बी हंगामात जिल्ह्यात २ लाख ५९ हजार ९९० हेक्टरवर (१२०.३९ टक्के ) पेरणी झाली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा रब्बीच्या क्षेत्रात ६ हजार ३५३ हेक्टरने वाढ झाली. पीकविमा योजनेत ज्वारी, गहू, हरभरा, उन्हाळी भुईमूग या पिकांचा समावेश आहे. यंदा सुरवातीच्या काळात पीक परिस्थितीत समाधानकारक आहे. त्यामुळे पीकविमा योजनेतील शेतकरी सहभाग कमी राहिला असल्याचे सांगितले जात आहे.
यंदा १ हजार ६०२ कर्जदार आणि ५३ हजार ८७५ बिगर कर्जदार मिळून एकूण ५५ हजार ४७७ शेतकऱ्यांनी पीकविमा प्रस्ताव सादर केले. एकूण ३६ हजार ८६८ हेक्टरवरील पिकांसाठी १२२ कोटी ३ लाख ९ हजार ६२ रुपयांचे विमा संरक्षण घेतले. त्यासाठी शेतकऱ्यांनी १ कोटी ८३ लाख ४ हजार ६३५ रुपये हप्ता भरला. शेतकरी आणि शासन यांचा मिळून एकूण १० कोटी ९६ लाख ९१ हजार ४६३ रुपये एवढा विमा हप्ता भरण्यात आला.
गतवर्षी (२०१९-२०) रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी १ लाख ४० हजार ७२२ विमा प्रस्ताव सादर करत ८१ हजार ६०३.६२ हेक्टरवरील पिकांसाठी २१५ कोटी ५४ लाख ६३ हजार रुपयांचे विमा संरक्षण घेतले होते. त्यासाठी ३ कोटी २३ लाख ३२ हजार रुपये हप्ता भरला होता. गतवर्षी १ लाख ५८ हजार १७५ हेक्टरवरील पिकांना विमा संरक्षण नव्हते.
रब्बी हंगाम २०२०-२१ पीकविमा स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)
पीक | पेरणी क्षेत्र | विमा सरंक्षित क्षेत्र | प्रस्ताव संख्या |
ज्वारी | ९८७७३ | १२१४३ | १७७८२ |
गहू | ३९०१४ | ४६९५ | ९९१४ |
हरभरा | ११८७१६ | १९८६२ | २७३२९ |
भुईमूग | ००० | १६७ | ४५२ |
- 1 of 1548
- ››