agriculture news in marathi, two arrested for fraud of grape producers, Maharashtra | Agrowon

द्राक्ष उत्पादकांच्या फसवणुकीप्रकरणी दोघांना अटक
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी फरार असणाऱ्या डी. पी. सेल्स काॅर्पोरेशनच्या दीपक व प्रशांत राजेभोसले या निर्यातदारांना निपाणी बेळगाव येथे बुधवारी (ता.१२) पोलिसांनी ताब्यात घेतले. नाशिक जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राजेभोसले बंधूंना तत्काळ अटक करीत नाशिक येथे आणले. या संशयित आरोपींना गुरुवारी (ता.१३) न्यायालयासमोर दाखल करण्यात आले. 

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी फरार असणाऱ्या डी. पी. सेल्स काॅर्पोरेशनच्या दीपक व प्रशांत राजेभोसले या निर्यातदारांना निपाणी बेळगाव येथे बुधवारी (ता.१२) पोलिसांनी ताब्यात घेतले. नाशिक जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राजेभोसले बंधूंना तत्काळ अटक करीत नाशिक येथे आणले. या संशयित आरोपींना गुरुवारी (ता.१३) न्यायालयासमोर दाखल करण्यात आले. 

या प्रकरणातील पहिला आरोपी डी. पी. सेल्सचा संचालक ज्ञानदेव राजेभोसले याला तीन महिन्यांपूर्वीच पोलिसांनी अटक केली आहे. ज्ञानदेव यांचे पुत्र असलेले अन्य दोन आरोपी मात्र फरार झाले होते. पोलिस त्यांच्या मागावर होते. 

ज्ञानदेव राजेभोसले यांच्यासह त्यांचे पुत्र दीपक व प्रशांत हे भागीदार असलेल्या डी.पी. सेल्स या द्राक्ष निर्यातीच्या कंपनीतर्फे मागील १०  वर्षांत अनेक शेतकऱ्यांकडून निर्यातक्षम द्राक्षांची खरेदी करण्यात आली. मात्र, बहुतांश शेतकऱ्यांना त्यांनी पैसे दिले नाहीत. त्यांनी वेगवेगळ्या नावाने कंपन्यांची नोंदणी करून शेतकऱ्यांसह शीतगृहधारक, आयातदार व अन्य पॅकिंग व्यावसायिकांचीही फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे. याबाबत पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्यात २०१७ मध्येच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर ताशेरे ओढले होते.

 पिंपळगाव बसवंत कनिष्ठ न्यायालयाने काही अटींवर जामीन देण्यात येईल, असा निकाल दिला. दरम्यान, राजेभोसले पिता पुत्रांनी संबंधित अटींचे पालन न केल्यामुळे न्यायालयाने पकड वॉरंट जाहीर केले. त्यानुसार अगोदर ज्ञानदेव राजेभोसले यांना, तर तब्बल तीन महिन्यांनंतर फरार झालेल्या दीपक व प्रशांत यांना अटक करण्यात आली.

द्राक्ष उत्पादकांनो, सावधगिरीने व्यवहार करा!
आरोपींकडून द्राक्षाचे पैसे न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली. द्राक्ष बाजारात असुरक्षितता खूप आहे. याबाबत सद्यःस्थिीत जागरूकता हाच उपाय आहे. व्यापारी व निर्यातदाराची पत नीट लक्षात घेऊन रोखीतच व्यवहार करावा. व्यवहारात संपूर्ण सावधगिरी बाळगावी, असे आवाहन या जाणकारांनी केले आहे.

इतर अॅग्रो विशेष
व्यापाऱ्यांनी शेतमाल बाजारातील बदल...पुणे ः बाजार समित्या बरखास्त केल्यास सक्षम...
नांदेड : सोयाबीनचा पेरणीपेक्षा अधिक...नांदेड  ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात...
पंचनाम्यांची ‘अतिवृष्टी’; रातोरात ९३...पुणे ः राज्य शासनाची यंत्रणा पिकाचे पंचनामे...
पीकविम्यापासून वंचित राहिल्यास कंपनी...अकोला ः जिल्ह्यात गेल्या महिन्यातील पावसाने...
उसावर आता तांबेरा, तपकिरी ठिबकेकोल्हापूर: सातत्याने पडणारे धुके व जमिनीतील...
राजू शेट्टीं थेट काश्‍मीरात;...कोल्हापूर : काश्मीरमधील सफरचंद, अक्रोड, केशर...
खरीप पिकांसाठी आठ हजार तर, फळबागांसाठी...मुंबई: राज्यात अवकाळी पावसाने नुकसान...
विदर्भ, मराठवाड्यात गारठा कायमपुणे : कोकण, मध्य महाराष्ट्राच्या विविध भागात...
बांबू कलाकारीतून तयार केली ओळखकला पदवीधर असलेल्या सौ. संगीता दिलीप वडे यांनी...
पर्यावरण संवर्धन, लोक शिक्षणामध्ये ‘...अकोला, वाशीम जिल्ह्यांतील सुमारे तीस...
सत्ता अन् जीवन संघर्षराज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून २२ दिवस...
नुकसानीचा बोजा केंद्रप्रमुख, जिनिंग...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस...
गडचिरोलीत रब्बी मक्‍यावर लष्करी अळीचा...गडचिरोली  ः धानकाढणीनंतर मका लागवड होणाऱ्या...
काटेकोर शेतीत द्राक्ष उत्पादक अग्रेसर:...पुणे : कष्ट व कौशल्याच्या बळावर कोणताही आकार आणि...
चीनमधील संत्रा खरेदीदारांचे शिष्टमंडळ...नागपूर ः चीनची बाजारपेठ मोठी असल्याने संत्रा...
रसायने, कीडनाशकांचा विवेकपूर्ण वापर...नवी दिल्ली: रसायने आणि कीडनाशकांचा अतिरेकी...
पीकविमा सुधारणेसाठी अखेर समिती स्थापनपुणे: ‘‘राज्यात सध्या राबविल्या जात असलेल्या...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मदत रखडण्याची...मुंबई: फडणवीस सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना...
काजू, आंबा, कोकम प्रक्रिया उद्योगाची...नाधवडे (जि. सिंधुदुर्ग) येथील भालचंद्र भिकाजी...
पुणे बाजार समितीत आवळा खातोय भाव,...‘क’ जीवनसत्वासाठी प्रसिद्ध असलेल्या आणि...