कापसाच्या पीक कापणीतून दोन गुंठ्यांत २ किलो ३७५ ग्रॅम उत्पादन

लोहगाव, जि. औरंगाबाद : लोहगाव महसूल मंडळाच्या खरीप हंगामातील कापूस पिकांची कृषी, महसूल विभाग व विमा प्रतिनिधीच्या उपस्थितीत पीक कापणी प्रयोग गुरूवारी (ता.२९) राबविण्यात आला.
Two from the cotton crop harvest Production of 2 kg 375 gms in bullets
Two from the cotton crop harvest Production of 2 kg 375 gms in bullets

लोहगाव, जि. औरंगाबाद : लोहगाव महसूल मंडळाच्या खरीप हंगामातील कापूस पिकांची कृषी, महसूल विभाग व विमा प्रतिनिधीच्या उपस्थितीत पीक कापणी प्रयोग गुरूवारी (ता.२९) राबविण्यात आला. दोन गुंठ्यांत २ किलो ३७५ ग्रॅम कापूस उत्पादन आले.

खरीप हंगामात शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या कापूस पिकांची हेक्टरी उत्पादकता काढण्यासाठी लोहगाव खुर्द शिवारातील शेतकरी राजेंद्र जगदाळे गट नंबर (८७) व इनुस पठाण (गट नंबर ८९) यांच्या क्षेत्रात २० बाय १० मीटर क्षेत्राची मोजणी करून पीक कापणी प्रयोग केला. त्यावेळी वेचणी केलेल्या कापूस पिकाचे वजन दोन किलो, ३७५ ग्रॅम भरले.

उपविभागीय कृषी अधिकारी अनिलकुमार हातगांवकर यांच्या पर्यवेक्षणाखाली बिडकीन, पैठण कृषी मंडळ आधिकारी रामनाथ कारले, विशाल साळवे, कृषी सहायक गणेश गोर्डे, विमा प्रतिनिधी अभिषेक खेडकर, राम घेगडे, दत्तात्रय पठाडे, हनिफ शेख, कय्युम पठाण यांनी कार्यवाही केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com