संकरित कपाशीचे दोन वाण बीटीमध्ये परावर्तित होणार

cotton
cotton

परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेले संकरित कपाशीचे एनएचएच २५० आणि एनएचएच ७१५ हे दोन वाण जनुकीय तंत्रज्ञानामध्ये (बीजी २) परावर्तित करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना या वाणांचे बियाणे सन २०२२ च्या हंगामामध्ये उपलब्ध होऊ शकेल. सन २०१६ मध्ये प्रसारित करण्यात आलेला कपाशीचा एनएचएच २५० हा वाण मध्य भारतातील महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि ओरिसा या राज्यांमध्ये लागवडीसाठी शिफारशीत करण्यात आला आहे. तर सन २०१७ मध्ये प्रसारित कपाशीचा एनएचएच ७१५ हा वाण मध्य भारत आणि दक्षिण भारतातील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा  तमिळनाडू राज्यांमध्ये लागवडीसाठी शिफारशीत करण्यात आला आहे. या दोन्ही वाणांचे उत्पादन आणि धाग्यांचे गुणधर्म राष्ट्रीय स्तरावरील संशोधनात सरस आढळून आले आहेत. हे दोन्ही वाण रस शोषण करणाऱ्या किडींना सहनशील आहेत.  यापूर्वी ‘वनामकृवि’ आणि महाबीज यांच्या संयुक्त विद्यमाने अन्य वाणांच्या तुलनेने सरस गुणधर्म असलेला कपाशीचा नांदेड ४४ (एनएचएच ४४) हा वाण बीटी परावर्तित करण्यात आला आहे. गतवर्षीच्या हंगामात नांदेड ४४ वाणाचे बियाणे महाबीजमार्फत मराठवाड्यातील शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले. या वाणास शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून या वाणाने शेतकऱ्यांना चांगले उत्पादन दिले आहे. त्याचप्रमाणे राज्याच्या अन्य भागातून एनएचएच ४४ बीटी या वाणाचे बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी महाबीजकडे वाढत आहे.  शेतकऱ्यांची मागणी विचारात घेऊन विद्यापीठाचे संकरित कपाशीचे एनएचएच २५० आणि एनएचएच ७१५ हे दोन नवीन वाण महाबीजद्वारे जनुकीय तंत्रज्ञानामध्ये (बीजी-२) परावर्तित करण्यात येणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com