वैनगंगा नदीच्या स्वच्छतेसाठी दोन कोटी : फुके

वैनगंगा नदीच्या स्वच्छतेसाठी दोन कोटी : फुके
वैनगंगा नदीच्या स्वच्छतेसाठी दोन कोटी : फुके

भंडारा ः वैनगंगा नदीमध्ये असलेल्या इकोर्निया वनस्पतीचे समूळ उच्चाटन करण्याकरिता भाडेतत्त्वावरील यंत्रसामग्रीचा उपयोग करावा. त्याकरिता जिल्हा प्रतिष्ठानमध्ये २ कोटी रुपयांची तरतूद करावी, असे निर्देश वनराज्यमंत्री परिणय फुके यांनी दिले.  खासदार सुनील मेंढे, आमदार चरण वाघमारे, रामचंद्र अवसरे, बाळा काशिवार, जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते व जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीत सन २०१९-२० करिता ९ कोटी ५३ लाख ६८ हजार रुपयांचा आराखडा सादर करण्यात आला. वैनगंगा नदीमध्ये इकोर्निया वनस्पतीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता भाडेतत्त्वावर मशिन लावून नदी स्वच्छ करावी. याकरिता दोन कोटी रुपये, आरोग्य विभागात नवीन यंत्र, उपकरणे व औषधी खरेदीकरिता अडीच कोटी रुपये, कुपोषण निर्मूलन, महिला आरोग्य अंतर्गत हिमोग्लोबीन, रक्‍तक्षय, बाल अत्याचार, बालविवाह रोखण्यासाठी प्रचार प्रसिद्धीकरिता एक कोटी रुपये, तसेच वरिष्ठ विकलांग व्यक्‍तीचे कल्याणाकरिता ५० लाख रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातील पशुसंवर्धन रुग्णालयाची दुरुस्ती, दूध उत्पादनात भरीव वाढ करण्यासाठी लसीकरण, जिल्हा परिषद व इतर शासकीय कार्यालयांमध्ये सौरऊर्जा प्रकल्पाची अंमलबजावणी, भूजलामध्ये वाढ करण्याकरिता १७५.०० लाख तर अवैध गौण खनिज उत्खनन थांबविण्याकरिता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याकरिता ५०.०० लाख रुपये राखीव ठेवण्यात आले, अशी माहिती देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com