Agriculture news in marathi Two crore reduction in Yavatmal water scarcity plan | Agrowon

यवतमाळच्या पाणीटंचाई आराखड्यात दोन कोटींची कपात

टीम अॅग्रोवन
शनिवार, 3 एप्रिल 2021

गेल्यावर्षी पावसाची संततधार तर काही भागात अतिवृष्टीची नोंद झाली. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी आहे. परिणामी पाणीटंचाई आराखडा साडेनऊ कोटींवरुन साडेसात कोटींवर आला आहे. 

यवतमाळ : गेल्यावर्षी पावसाची संततधार तर काही भागात अतिवृष्टीची नोंद झाली. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी आहे. परिणामी पाणीटंचाई आराखडा साडेनऊ कोटींवरुन साडेसात कोटींवर आला आहे. 

जिल्ह्यातील २०२४० गावांपैकी ६२५ गावांमध्ये पाणीटंचाईचे संकेत पाणीपुरवठा आणि भूजल सर्व्हेक्षण विभागाने दिले आहेत. या अहवालाच्या आधारे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून संभाव्य टंचाई निवारण आराखडा तयार करण्यात आला आहे. साडेसात कोटी रुपयांच्या या आराखड्यातून टँकर, विहिरींचे अधिग्रहण, विहिरींमधील गाळ काढणे, पूरक नळ योजना, पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती या कामांचा समावेश आहे. 

जिल्ह्यात २०२०-२१ या वर्षात सरासरीच्या ९१ टक्‍के पावसाची नोंद झाली. त्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता गेल्या काही वर्षातील टंचाईच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळेच दर वर्षी साडेनऊ कोटी रुपयांची तरतूद पाणीटंचाईसाठी होत असताना या वर्षीचा आराखडा अवघ्या साडेसात कोटी रुपयांचा आहे. या आराखड्यामध्ये जिल्ह्यातील दुर्गम भागातील गावाचा समावेश आहे. 

मार्चनंतर या गावांमध्ये पाणी समस्या उद्भवणार असल्याचे संकेत असल्याने त्या पार्श्‍वभूमीवर आतापासूनच उपाययोजनांवर लक्ष्य केंद्रित करण्यात आले आहे. माळपठार भागांसह जिल्ह्याच्या विविध भागात पाणीटंचाई भासणार आहे. त्याकरिता प्रशासनाने ३४० विहिरींच्या अधिग्रहणाचा प्रस्ताव दिला आहे.

टॅंकरमुक्‍तीकडे वाटचाल 
प्रशासनाच्या प्रयत्नाने जिल्ह्याची वाटचाल नजीकच्या काळात टॅंकरमुक्‍तीकडे होत आहे. २०१८ मध्ये १०४ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात होता. २०१९ मध्ये ही संख्या ६९ पर्यंत खाली आली आणि आता अवघ्या २१ टॅंकरचे नियोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यावर दृष्टिक्षेप 

  •   एकूण गावे ः २०४० 
  •   पाणी टंचाईग्रस्त गावे ः ६२५ 
  •   बोअरवेलची दुरुस्ती होणार ः ५०० 
  •   विहिरींमधील गाळ काढणार ः ६ 
  •   नव्या बोअरवेल ः १०० 
  •   पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती ः ४८

इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...
शनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...
परभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...
नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...
सोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...
अकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...
मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...
कोल्हापूर : पीकविम्याच्या ऑनलाइन...कोल्हापूर : विमा योजनेत सहभागाबाबतीत राज्यात...
नाशिक : पीकविम्याबाबत तक्रारींचा पाढानाशिक : पीकविमा कंपन्यांची असक्षम यंत्रणा......
सिंधुदुर्गात कार्यालय; पण शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरी : विमा कंपनीचे सिंधुदुर्गनगरी येथे...
रत्नागिरी : पूरबाधित शेतकऱ्यांची...रत्नागिरी : जिल्ह्यातील नदी किनारी भागात पुरामुळे...
नांदेडमध्ये विमा कंपनीचे जिल्ह्याच्या...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यासाठी...
नगर : विमा कार्यालय, हेल्पलाइन नंबरची... नगर : नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी,...
कोल्हापूर : पूर फुटाने वाढला, इंचाने...कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरस्थिती हळूहळू कमी होत...
राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे...मुंबई : राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे...
विमा कंपनीचा कारभार चालतोय कृषी...सातारा : जिल्ह्यात खरिपाच्या सुरूवातीस पावसाने...
चिपळूणमधील पूरग्रस्तांसाठी पुनर्वसन...रत्नागिरी : ढगफुटीसदृश पावसामुळे चिपळूणकरांचे...
पाणी ओसरताच तातडीने पंचनामेकोल्हापूर : पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत राज्य...
शेतकरी नियोजन पीक : कांदाशेतकरी : नंदकुमार काशिनाथ उशीर गाव : धोडंबे, ता...
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...